कल्याणीनगर येथे निवासी भागात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला.कल्याणीनगर येथील निवासी भागात असलेल्या एका लॉजमध्ये (Pune Lodge) सुरू असलेल्या वेश्या व्यवसाय प्रकरणी लॉजचालक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनिया गिडवाणी असे त्या महिलेचे नाव आहे. पोलिस तक्रारीत नाव नमूद असूनही सुरुवातीला महिलेवर गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला नव्हता. आता महिलेसह अन्य दोघांना या प्रकरणी नव्याने आरोपी केले गेले आहे.कल्याणीनगर येथे निवासी भागात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी लॉज व्यवस्थापक अमोल तांबडे (वय २८, रा. श्रीरामपूर, अहिल्यानगर) आणि एजंट बंटी या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ सह, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलिस अंमलदाराने दिलेल्या तक्रारीत लॉजचालक महिलेच्या नावाचा उल्लेख असतानाही तिच्यावर गुन्हा दाखल केला नव्हता.











