कुणाल कामरा वादात BMCची एन्ट्री, पथक पोहोचलं; कंगना प्रकरणाची पुनरावृत्ती होणार?

 स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं सादर केलेल्या एका कवितेवरुन शिवसेना आक्रमक झाली आहे. कामरानं कवितेमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अपमान केल्याची, त्यांची खिल्ली उडवल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं सादर केलेल्या एका कवितेवरुन शिवसेना आक्रमक झाली आहे. कामरानं कवितेमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अपमान केल्याची, त्यांची खिल्ली उडवल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. कामरानं स्टँड अप कॉमेडी केलेल्या मुंबईतील हॅबिटट स्टुडिओमध्ये घुसून शिवसैनिकांनी तोडफोड केली. कुणाल कामराला फिरु देणार नाही, असा इशारा शिवसेना नेत्यांनी दिला. त्यानंतर आता या सगळ्या वादात मुंबई महापालिकेची एन्ट्री झालेली आहे.मुंबई महापालिका अधिकाऱ्यांचं एक पथक हॅबिटट स्टुडिओमध्ये पोहोचलं आहे. त्यामुळे या प्रकरणात पालिका नेमकी काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागलं आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी अभिनेत्री कंगना राणौतनं ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेनं कंगनाच्या खारमधील कार्यालयावर कारवाई करत बुलडोझर चालवला होता. आता तशीच कारवाई पालिका हॅबिटटवरुन करणार का, अशी चर्चा जोर धरु लागली आहे.कामराच्या शोनंतर वाद झाल्यामुळे हॅबिटट स्टुडिओनं एक निवेदन प्रसिद्ध केलं. आम्ही स्टुडिओ अनिश्चित काळासाठी बंद करत असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘कलाकार त्यानं मांडलेल्या विचारांसाठी स्वत: जबाबदार आहे. त्यानं सादर केलेल्या कंटेटमध्ये आमचा समावेश कधीही नव्हता. पण सध्या घडत असलेल्या घटना पाहता या सगळ्यासाठी आम्हाला दोषी का धरलं जातं, आम्हाला लक्ष्य का करण्यात येतं, याचा विचार करण्यास आम्हाला भाग पाडलं आहे. आम्हीच कलाकाराचे प्रतिनिधी आहोत, अशा प्रकारे आम्हाला धारेवर धरलं जातं. जोपर्यंत आम्ही स्वत:ला आणि आमच्या मालमत्तेला धोक्यात टाकल्याशिवाय अभिव्यक्तीसाठी एक व्यासपीठ पुरवण्याचा सर्वोत्तम पद्धत शोधत नाही, तोपर्यंत स्टुडिओ बंद करत आहोत,’ असं हॅबिटट स्टुडिओकडून सांगण्यात आलं.आपल्या विनोदांनी, हजरजबाबीपणानं लोकांना हसवणाऱ्या कुणाल कामरानं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. कुणाल कामरानं ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील ‘भोली सी सुरत’च्या चालीवर कुणाल कामरानं विडंबनगीत सादर केलं. त्या गाण्यात उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचा थेट उल्लेख नव्हता. हा व्हिडीओ समोर येताच शिवसेना आक्रमक झाली.कामराचा व्हिडीओ व्हायरल होताच शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी मुंबईच्या खारमधील स्टुडिओत घुसून तोडफोड केली. कामराच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी कामराविरोधात तक्रार नोंदवली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.