साताऱ्यातील दोघांचं थायलंडमध्ये लज्जास्पद कृत्य, जर्मन तरुणीवर अत्याचार, पोलिसांकडून अटक.

महाराष्ट्राला आणि देशाला शर्मेने मान खाली घालवणारी घटना थायलंडमध्ये घडल्याचे समोर येत आहे. साताऱ्यातील दोन व्यक्तींनी थायलंडमध्ये एका बीचवर जर्मन तरुणीवर बलात्कार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.महाराष्ट्राला आणि देशाला शर्मेने मान खाली घालवणारी घटना थायलंडमध्ये घडल्याचे समोर येत आहे. साताऱ्यातील दोन व्यक्तींनी थायलंडमध्ये एका बीचवर जर्मन तरुणीवर बलात्कार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. विजय घोरपडे (वय ४७) आणि राहुल भोईटे (वय ४०) अशी या नराधमांची नावे आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, थायलंडमधील कोह फा नगान बेटावर २४ वर्षीय जर्मन तरुणीवर बलात्कार केला. ही घटना १४ मार्चला सकाळी ४.५० च्या सुमारास झाली. रन बीचवर फुल मून पार्टी ती आपल्या मित्रासोबत आली होती. पहाटे तिला विजय आणि राहुल यांनी एका खडकावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि ते तिथून निघून गेले.या भयंकर प्रकारानंतर, पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यानंतर तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हिडिओ फुटेजची तपासणी केली. त्यात तिच्यासोबत विजय आणि राहुल यांच्या व्यतिरिक्त तेथे इतर कोणी नसल्याचे समोर आले. त्यानंतर दोघांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आले. दोघांनीही सुरुवातीला आरोप नाकारत उडवाउडवीची उत्तरे दिली. परदेशी तरुणी शुद्धीवर नसल्याने तिला आरोपींची ओळख पटवता आली नाही.दुसऱ्या दिवशी १६ मार्चला विजय आणि राहुल या दोघांनाही पोलिसांनी पुन्हा चौकशीसाठी बोलवले. त्यावेळी तरुणीने या दोघांची ओळख पटवली. त्यानंतर चौकशी दरम्यान विजयने आरोप मान्य केले तर राहुल याने आरोपांचे खंडन केले. परंतु पीडित तरुणीला मिठीत घेतल्याचे आणि तिला किस केल्याचे मान्य केले. संशयितांवर ‘पीडितेला असुरक्षित परिस्थितीत जबरदस्तीने छळ करून बलात्कार’ केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या गुन्ह्यात ४-२० वर्षांचा तुरुंगवास आणि ४००,००० बाहट (₹१०,३३ लाख) पर्यंत दंडाची तरतूद आहे.
सध्या दोन्ही आरोपींची रवानगी थायलंडमधील तुरुंगात करण्यात आली आहे. सोशल मीडियावर यासंबंधी व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात दोन्ही आरोपींना अटक केल्याचे दिसत आहे.विजय आणि राहुल या दोघांनीही आपले चेहरे लपवले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.