नागपूर हिंसाचार प्रकरण! मृत्यू झालेल्या इरफान अन्सारी प्रकरणात 4 आरोपींना अटक, 2 आरोपी अल्पवयीन .

 नागपूर हिंसाचारात मृत्यू पावलेल्या इरफान अन्सारी  प्रकरणात नागपूर पोलीसांनी चार आरोपींना अटक केली आहे. मृत्यू पावलेल्या इरफान अन्सारी  प्रकरणात नागपूर पोलीसांनी चार आरोपींना अटक केली आहे. चार आरोपींपैकी दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त महक स्वामी यांनी दिली आहे. इरफान अन्सारी हा सोमवारच्या रात्रीला इटारसीला जाण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकाकडे निघाला होता. यावेळी गीतांजली चौकात हिंसाचाराच्या राड्यात तो सापडला होता. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले होते, काल उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.मृत इरफान अन्सारी  हिंसाचारात सहभागी झाला होता की नाही याचा पोलीस शोध घेत असल्याचे पोलीस उप आयुक्त महक स्वामी यांनी सांगितले आहे. सोमवारी रात्री नागपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडली होती. यामध्ये काहीजण जखमी झाले होते. त्यामध्ये  इरफान अन्सारी हा एक होता. त्याच्या उपचार सुरु होते. मात्र, काल त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरून राज्यात वाद सुरू आहे. राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबादेतील  कबर हटवण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. नागपुरात औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे दंगल झाली आहे. मराठवाड्यातहीतणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे. औरंगजेबाची कबर  उखडून टाका अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. तसंच 17 मार्च रोजी औरंगजेबाची कबर उखडण्याच्या मुद्द्यावरुन नागपूरमध्ये दंगलही उसळली होती. त्यानंतर औरंगजेबाची कबर झाकून ठेवण्यात आली आहे.

नागपूरसह मराठवाड्यातही तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एनआयए दिल्लीचे एक पथक   शहरात दाखल झाले आहे. परभणी, जालना, या ठिकाणीदेखील पथक गेले असून तेथील संशयित हालचालींवर लक्ष आहे. या प्रकरणात एटीएस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याची माहिती आहे.नागपूर हिंसाचार प्रकरणी नागपूर पोलिसांचे वेगवेगळे पथक तपासाच्या वेगवेगळ्या दिशेने काम करत आहेत. आतापर्यंत 90 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र दंगलखोर अजूनही लपून बसले आहेत. त्यांची ओळख पटवण्यासाठी नागपूर पोलिसांचा सायबर सेल कामाला लागले आहे. सायबर सेल उपलब्ध सीसीटीव्ही, मोबाईल फुटेज, मीडिया फुटेज, सोशल मीडिया पोस्ट, सोशल मीडिया पेजेसच्या माध्यमातून दंगलखोरांची ओळख पटवून त्यांचा डाटा बेस तयार करत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.