नागपूर हिंसाचारात आणखी एका आरोपीच्या घरावर हातोडा; राज्य सरकारची धडक कारवाई सत्र सुरुच.

फहीम खानच्या घरावरील या कारवाईनंतर नागपूर हिंसाचारात आरोपी असलेल्या युसुफ शेख याच्या घरावरही अशीच एक कारवाई करण्यात आली आहे.नागपूर हिंसाचारात प्रमुख आरोपी आणि घटनेचा मास्टर माईंड असलेल्या फहीम खान याचा घरावर कारवाई करण्यात आली आहे. नागपूर दंगलीचा कथित मास्टर माईंड फईम खान यांच्या घरावर मनपाकडून आज बुलडोझर कारवाई करण्यात येत आहे.नागपूर महानगर पालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून ही कारवाई करण्यात आली असून प्रशासनही ऍक्शन मोडमध्ये आल्याचे दुसून येत आहे.या प्रकरणात आतापर्यंत फहीम खान व युसुफ शेख या दोन आरोपीच्या घरावर अतिक्रमणाची कारवाई केली गेली, तर शाहीन अमीन या आरोपीचे दोन दुकाने सिल करण्यात आली.

नागपूर हिंसाचार प्रकरणात राज्यसरकारच्या बेधडक कारवाईला वेग प्राप्त झाला असून नागपूर महानगर पालिकेच्या अतिक्रमण पथक ही आता ऍक्शन मोड मध्ये आल्याचे चित्रा आहे.फहीम खान व युसुफ शेख या दोन आरोपीच्या घरावर अतिक्रमणाची कारवाई केली गेलीय, तर शाहीन अमीन या आरोपीचे दोन दुकाने सिल करण्यात आली आहेत.संजय बाग कॉलनीतील फहीम खानचे घर नागपूर महानगर पालिकेच्या पथकाने जमीनदोस्त केले आहे.

त्यानंतर नागपूर हिंसाचारात आरोपी युसुफ शेख यांचे नागपूरच्या महाल भागातील जोहरीपूर येथे घर त्यावर पालिकेने हातोडा चालवला आहे.युसूफ शेख घरात खाली पार्किंग मध्ये एक रुम अनधिकृत आहे सोबतच अधिकृत नकाशा व्यतिरिक्त पहिल्या व दुसऱ्या माळ्यावरील बालकनीचे बांधकाम करण्यात आले होते, ते नागपूर महानगर पालिकेच्या पथकाने तोडले आहे.गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या मध्ये युसूफ शेख चे नाव हे 48 नंबर आहे तर फहीम खान मुख्य आरोपी पैकी एक आहे. नागपूरमध्ये सुरु असलेल्या या बेधडक कारवाईत आता राज्यसरकारची धडक कारवाई सुरु असल्याचे चित्र आहे.नागपूर हिसाचार प्रकरणात मोमीनपुरा भागात राहणाऱ्या शाहीन अमीन या आरोपीची हि दोन दुकाने आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.