उत्तर प्रदेशातील खतरनाक गुन्हेगार, 50 हजारांचं इनाम.

 उत्तर प्रदेशातील सराईत गुन्हेगार गेल्या सहा महिन्यांपासून फरार होता. संशयिताला पकडून देणाऱ्याला पोलिसांकडून 50 हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते.उत्तर प्रदेशातील महू जिल्ह्यातील अलीनगर येथे खून आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला नाशिक पोलिसांच्या मदतीने  उत्तर प्रदेशाच्या पोलिसांनी अटक केली आहे. सत्येंद्र महेंद्र खरवार (21) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. सत्येंद्र खरवार याच्यावर उत्तर प्रदेशात अनेक पोलीस स्टेशनमध्ये 9 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तो अनेक महिन्यांपासून उत्तर प्रदेशातून फरार होता. या संशयिताला पकडून देणाऱ्याला उत्तर प्रदेश पोलिसांकडून 50 हजार रुपयांचे बक्षीस देखील जारी करण्यात आले होते. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या संशयिताला अटक करण्यात आली आहे. हा संशयित गेल्या अनेक महिन्यांपासून अंबड एमआयडीसीच्या एका खाजगी कंपनीत काम देखील करत होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेश राज्यातील मऊ जिल्ह्यामधील वेगवेगळ्या पोलीस पोलीस ठाण्यांमध्ये 9 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेला संशयित आरोपी सत्येंद्र हा मागील सहा महिन्यांपासून फरार होता. अथक प्रयत्न करुन देखील तो सापडत नसल्याने त्याच्यावर पोलीस उपमहानिरिक्षक आजमगढ, उत्तरप्रदेश यांनी 50 हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. तो अंबड एमआयडीसीमधील एका कंपनीत कामाला असल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्तरप्रदेशचे पोलिसांचे पथक चुंचाळे पोलिस चौकी येथे दाखल झाले. यानंतर चुंचाळे एमआयडीसी पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे हवालदार जनार्दन ढाकणे व अर्जुन कांदळकर यांनी शोध घेऊन अंबड औदयोगिक वसाहतीतील एका कंपनीतून त्याला ताब्यात घेतले.

उत्तरप्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्स टिमसह संयुक्त कारवाई करुन त्याला चुंचाळे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला उत्तरप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.दरम्यान, शुक्रवारी रात्री हॅपी होली म्हणत अंगावर पेट्रोल टाकून सफाई कर्मचाऱ्याला एका मद्यपीने पेटवून दिले होते. नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकात ही घटना घडली होती. यात सफाई कामगार 60 टक्के भाजला होता. त्याला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान सफाई कर्मचारी विजय गेहलोत याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर काही तासातच आरोपी शुभम जगताप याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.