पत्नीचे प्रेम प्रकरण समजले अन् पती पोलीस शिपायाने प्रियकराला मित्रासोबत संपवले, दुहेरी हत्याकांडाने खळबळ.

उत्तरप्रदेशातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. लखनऊच्या काकोरी परिसरातील दुहेरी हत्याकांडाने सारेच हादरले आहेत. प्रेम प्रकरणातून एका पोलीस शिपायाने दोघांची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या केली आहे.उत्तरप्रदेशातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. लखनऊच्या काकोरी परिसरातील दुहेरी हत्याकांडाने सारेच हादरले आहेत. प्रेम प्रकरणातून एका शिपायाने दोघांची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या केली आहे. याप्रकरणी लिसांनी शिपायासोबत त्याच्या पत्नीलाही बेड्या ठोकल्या आहेत. तर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
वृत्तानुसार, मुख्य आरोपीचे नाव महेंद्र कमार असून तो उत्तरप्रदेशातील पोलीस दलात शिपायाचे काम करत होता. तर सध्या तो लखीमपूर येथे ड्युटीवर होता. २०१८ मध्ये त्याची दिपिका हिच्याशी लग्न झाले होते. दिपिकाचे लग्नाआधीपासून मनोज नामक व्यक्ती प्रेम प्रकरण होते. एवढेच नाहीतर लग्नानंतरही तिने मनोजसोबत संबंध ठेवले होते. दोघांमध्ये संवाद सुरुच होता.

यामुळे महेंद्र कुमारला संताप अनावर झाला होता.जसे महेंद्रला या प्रेम प्रकरणाबाबत समजले तेव्हा त्याला राग अनावर झाला. त्यांच्यामध्ये खटके उडू लागले. वादातून त्याने दिपिकाला प्रियकराकडे निघून जाण्यास सांगितले. परंतु दिपिका महेंद्रसोबतचे संबंध तोडण्यास तयार नव्हती. हे पाहता त्याने त्या प्रियकराला आपल्या घरी बोलावण्यास सांगितले. दिपिकाच्या एका कॉलवर मनोज तडक तिला भेटायला त्याच्या मित्रासोबत तिच्या घरी पोहोचला. जिथे महेंद्रने आधीच त्याला मारण्याचा कट रचल्याचे समजते.मनोजने घरात पाऊल ठेवताच महेंद्रने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. हल्ला एवढा भीषण होता की, यामध्ये महेंद्रसोबत त्याच्या मित्राचाही मृत्यू झाला. यानंतर मारेकरी महेंद्रने तेथून पळ काढला. या घटनेनंतर सारेच हादरले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांनी दोन्ही तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले.

पोलिसही समोरील दृश्य पाहून हैरान झाले. एकाचा गळा कापण्यात आला होता तर दुसऱ्याचे मनगट कापण्यात आले. यानंतर परिसरात खळबळ उडाली. मृताच्या नातेवाईकांनी निदर्शने केली. रास्ता रोको करण्यात आला. पण पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.