घराला आग लागल्याचा बनाव, पाच जणांच्या मृत्यूचं गूढ उकललं; पत्नी आणि तीन मुलांसोबत आक्रीत घडलं.

पतीने घरात आग लागल्याचा बनाव केला आणि त्यानंतर स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र आग लागली नसून लावली असल्याचा असल्याचं समोर आलं आहे. घरात झालेल्या एका स्फोटाबाबत आता मोठा खुलासा झाला आहे. घरातच राहणाऱ्या हरपाल सिंह या व्यक्तीने आपल्या पत्नी आणि दोन मुलं आणि एका मुलीच्या हत्येबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्या व्यक्तीने स्वत: घराला आग लावून त्यानंतर स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण तो थोडक्यात बचावला. या स्फोटामागचं गूढ आता पोलिसांनी उकललं आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मागील अनेक दिवसांपासून चिंताग्रस्त होता. संपूर्ण घरात स्फोट घटवण्याच्या एक दिवस आधी त्याने एक सुसाइड नोट लिहिली होती. तसंच घरातील मृत व्यक्तींच्या शरीरावर धारदार शस्त्राचे निशाण देखील आढळले.

तसंच घरात पेट्रोलच्या बॉटल आढळल्या. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सोमवारी कोर्टात दाखल केलं जाणार आहे. हरियाणातील बहादूरगढ इथे ही घटना घडली.हरपालने आधी आपल्या घरातील सर्वांना झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर काही सदस्यांवर चाकूने हल्ला केला. सर्वांना ठार केल्यानंतर त्याने पेट्रोल टाकून घराला आग लावली. आग लावल्याने घरात स्फोट झाला. त्या आगीत आरोपी स्वत: सापडला. पण तो थोडक्यात बचावला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो पळून गेला.

पण पोलिसांनी त्याला शोधून ताब्यात घेतलं.दरम्यान, घरात आग लावल्यानंतर या आगीत हरपाल सिंहची दोन मुलं जसकीरत सिंह, सुखविंदर सिंग, मुलगी चहक सिंग आणि पत्नी संदीप कौर यांचा मृतांमध्ये समावेश आहे. हरपालनेही कुटुंबीयांच्या मृत्यूनंतर आत्महत्येचा प्रयत्न केला पण यात यशस्वी झाला नाही.पोलिसांनी सांगितलं, की आरोपी हरपाल सिंह मूळचा उत्तराखंडचा रहिवासी होता. तो ट्रान्सपोर्टचं काम करत होता. त्याचा बहीण आणि मेहुण्यासोबत प्रॉपर्टीवरुन वाद सुरू होता. त्याशिवाय काही कारणांवरुन तो अतिशय त्रासात होता. त्यातूनच त्याने हे भयंकर कृत्य केलं. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यानंतर हा अपघात असल्याचं लोक समजत होते. पण नंतर या घटनेचं सत्य समोर आलं आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.