आधी बेपत्ता, नंतर तरुणाला स्विफ्टमध्ये टाकून कार कॅनोलमध्ये ढकलली; साताऱ्यात तरुणाला क्रूरपणे संपवलं.

साताऱ्यात तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली. तरुणाला ठार करुन त्याला कारमध्ये भरुन नंतर कार कॅनोलमध्ये ढकलली. या घटनेने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.गोंदवले येथील योगेश सुरेश पवार हा रोशनीच्या प्रेमात पुरता पागल झाला होता. मात्र, त्याच प्रेमाने त्याचा घात केला. तरुणाची हत्या केलेल्या संशयितांना पकडणं पोलिसांपुढे आव्हान असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी अखेर प्रयत्नांची पराकाष्ठा करत संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, गुरुवारी २० मार्च रोजी योगेश पवार गायब झाल्याची पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या निरीक्षणाखाली योगेश पवार हा कुठे गायब झाला? त्याचे काय बरेवाईट झाले आहे का? याचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आलं. पोलिसांना सुरुवातीला काही धागेदोरे सापडत नव्हते. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पद्धतीचा अवलंब केल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे योगेश सर्वात शेवटी माण तालुक्यातील नरवणे येथे गेल्याचं समजलं. त्यानुसार नरवणेमध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे योगेशचं नरवणेच्या माहेरवाशीनीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली.मात्र, पोलिसांनी संशयित माहेरवाशीनीच्या घरी जाऊन चौकशी केली असता ती तिथे आढळून आली नाही.

त्यानंतर संशयित आरोपी बारामती आणि मुंबई येथे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यापैकी प्रथमेश आणि अकील विश्वकर्मा या दोघांना बारामतीमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे केलेल्या कसून चौकशीनंतर त्यांनी लोखंडी गजाने मारून योगेशची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर उर्वरित संशयितांची नावं पोलिसांपुढे निष्पन्न झाली.संशयितांपैकी नरवणे गावची माहेरवाशीन रोशनी माने आणि तिची आई पार्वती माने या दोघींना मुंबईतून ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता या हत्या प्रकरणात एकूण सात जण सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.ताब्यात असलेल्या चार जणांकडे पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीनंतर योगेशची निर्घृण हत्या केली.

त्यानंतर त्याला स्विफ्ट गाडीमध्ये टाकून, गाडी लॉक करून गाडीसह नातेपुते परिसरात पाण्याच्या कॅनॉलमध्ये टाकून दिलं. त्यानंतर पोलिसांनी राबवलेल्या शोध मोहिमेनंतर सदर गाडी फडतरीला जाणाऱ्या रोडवरील कॅनॉलच्या ठिकाणी आढळून आली. त्यानंतर स्विफ्ट गाडी आणि योगेशचा मृतदेह क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला. याबाबत नातेपुते पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.मृत योगेश पवार याचा मोठा भाऊ तेजस पवार याने दहिवडी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सात पैकी चारजण दहिवडी पोलिसांच्या ताब्यात असून तिघांचा तपास पोलीस घेत आहेत. या एकूण गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.