अकोला शहरातील जेतवन नगरमध्ये एका तरुणावर किरकोळ कारणावरून चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. मजुरीचे पैसे घ्यायला गेलेला करण घरी परतलाच नाही.अकोला शहरातील जेतवन नगरमध्ये एका तरुणावर किरकोळ कारणावरून चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. मजुरीचे पैसे घ्यायला गेलेला करण घरी परतलाच नाही. तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचबरोबर त्याचे तीन साथीदारही गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच खदान पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
वृत्तानुसार, मृत तरुणाचे नाव करण चितडे आहे. पगार घेऊन येतो, असे सांगून निघालेल्या करणला मारहाण करण्यात आली. त्याने ही माहिती आईला फोनवर दिली. आई त्याला वाचविण्यासाठी पोहचेपर्यंत करण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, असे करणच्या आईने सांगितले आहे.करणची आईने असेही सांगितले की, आठवडाभर मोलमजुरी केल्यावर रविवारी मजुरीचे पैसे घ्यायला गेलेला करण परत आलाच नाही, तोंडावरच मोठ्या बहिणीचं लग्न आल होतं आणि अशातच हा अनर्थ घडला आहे.










