मुस्कानने सौरभला संपवण्यासाठी खरेदी केलेलं इंजेक्शन, मेडिकलवर छापेमारी; मोठी माहिती समोर.

सौरभच्या हत्याकांडआधी त्याची पत्नी मुस्कानने एका मेडिकलमधून इंजेक्शन घेतलं होतं. त्या मेडिकलवर छापेमारी करण्यात आली आहे.सौरभ हत्याकांड प्रकरणी दररोज नव्या नव्या गोष्टी समोर येत आहेत. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सौरभच्या हत्याकांडप्रकरणी रविवारी एका मेडिकल स्टोअरमध्ये चौकशी करण्यात आली. या मेडिकलमधून सौरभच्या पत्नीने मुस्कानने नशेची औषधं खरेदी केली होती. मेरठमधील या मेडिकलवर ड्रग्स इन्स्पेक्टर आणि त्यांच्या टीमने छापेमारी केली. सौरभच्या हत्याकांड प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी मुस्कानने काही औषधं या मेडिकलमधून घेतल्याचं समोर आलं होतं. आता त्याबाबत चौकशी सुरू आहे.याप्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, की मुस्कानने कोणत्या प्रकारची औषधं खरेदी केली होती, याचा तपास सुरू आहे. ही औषधं डॉक्टरांनी लिहून दिली होती किंवा ‘ओव्हर द काउंटर’ दिली होती याची चौकशी सुरू आहे. मिडाझोलम इंजेक्शन मुस्कानने खरेदी केलं होतं.

हे इंजेक्शन घेण्यासाठी तिने डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन आणलं होतं, अशी माहिती मिळते आहे. याप्रकरणात आता केवळ एका आठवड्याचे नाही तर गेल्या दीड ते दोन वर्षांपासूनचे रेकॉर्ड तपासले जात आहेत.कोणत्याही मेडिकल स्टोअरने प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं दिलं असेल तर तो मोठा गुन्हा आहे, त्यात मेडिकल स्टोअरचाही सहभाग मानला जाईल आणि गुन्हाही दाखल केला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं. याशिवाय मेडिकल स्टोअरचा परवाना देखील निश्चितपणे रद्द केला जाईल. कारण कोणीही नशेची औषधं विकू शकत नाही. ऍनेस्थेसिया देखील फक्त रुग्णालयात उपलब्ध आहे.

त्यामुळे मुस्कानने जिथून औषधं घेतलं ते कोणी आणि कसं दिलं याचा तपास सुरू आहे.याबाबत मेडिकल मालकाने सांगितलं, की मुस्कानने इथे कधी आणि कोणतx औषध विकत घेतलं हे सांगणं कठीण आहे, कारण ती गोष्ट जुनी झाली आहे. तिने येथून औषधं घेतल्याचं आम्हाला आता पोलिसांकडून समजलं. मोबाईलवर प्रिस्क्रिप्शन दाखवून तिने औषध घेतलं, मात्र तिने कोणतं औषध घेतलं हे सांगणं कठीण आहे. डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन होतं, त्याशिवाय दुकानात औषध दिलं जात नाही.दरम्यान, सौरभच्या पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून सौरभची हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते ड्रममध्ये टाकून त्यावर सिमेंट भरलं. सौरभची क्रूरपणे हत्या केलेल्या मुस्कान आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.