बोगस डॉक्टरने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, प्रचंड रक्तस्त्राव होऊन महिला अत्यवस्थ, परिसरात खळबळ.

श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही नियमानुसार परवानगी अथवा डिग्री नसताना हे बोगस डॉक्टर गोरगरीब रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार कुडगाव येथे घडलेल्या या घटनेमुळे समोर आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसायाचा बाजार मांडणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या विरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.रायगड जिल्ह्यातील कुडगाव येथे असणारा बोगस डॉक्टर शंकर कुंभार याने गर्भवती असलेल्या महिलेस गर्भपात होण्यासाठी बेकायदेशीररित्या गर्भपात व्हावा यासाठी काही गोळ्या चुकीच्या पद्धतीने दिल्या. मात्र त्या गोळ्यांचा गर्भवती महिलेवर विपरित परिणाम होत प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव होत तिची प्रकृती चिंताजनक झाली. या महिलेला श्रीवर्धन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून बोगस डॉक्टर शंकर कुंभार याच्या विरोधात श्रीवर्धन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष नारायणकार यांनी दिघी सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,तालुक्यातील एक गर्भवती महिला, योग्य औषधोपचार मिळून असणारी गर्भधारणा संपुष्टात यावी यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव येथील डॉक्टर शंकर कुंभार याच्या खासगी दवाखान्यात गेली होती.

मात्र बोगस डॉक्टर  शंकर कुंभार याने कोणतीही वैद्यकीय चाचणी किंवा सोनोग्राफी न करता तिला गर्भपात होण्याच्या गोळया घेण्याबाबत सांगितले. तसेच या गोळया कोणत्यातरी मेडीकल स्टोअरमधून आणून उपलब्ध करून दिल्या.सदर महीलेने गर्भपात करण्याच्या गोळयांचे सेवन केल्याने तिच्या शरीरातुन अतिरिक्त रक्तस्व होवून तिची तब्येत बिघडून तिच्या जिवाला धोका निर्माण झाला व त्यातुन तिचा गर्भपात झाला आहे. डॉक्टर शंकर कुंभार याने दिलेल्या या गोळ्यांचा विपरीत परिणाम होत सदर महिलेस मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावाला सामोरे जावे लागले. काही वेळाने तिची प्रकृती खालावत गेली, तेव्हा नातेवाइकांनी तिला तातडीने श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही नियमानुसार परवानगी अथवा डिग्री नसताना हे बोगस डॉक्टर गोरगरीब रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार कुडगाव येथे घडलेल्या या घटनेमुळे समोर आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसायाचा बाजार मांडणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या विरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, संबंधित बोगस डॉक्टरांवर कारवाईची मागणी होत आहे. याबाबत दिधी (सागरी) पोलीस ठाणे गुरनं.19/2025, बी एन एस 2023 दुरूस्ती कायदा 2021 चे कलम 05 प्रमाणे 88 92 125 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोनी.कुथे हे करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.