वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; मोहफुल वेचायला गेली असताना घडली घटना, परिसरात घबराट.

शिवराम टोला येथील महिला मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. ही फुले वेचत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.मोहफुले वेचायला जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार मारले. ही घटना अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शिवराम टोलाच्या जंगलात रविवारी सकाळच्या सुमारास घडली. हल्ल्यानंतर वाघ बराच वेळ मृतदेहाजवळ बसून होता.अनुसया धानू कोल्हे (४५) असे मृत महिलेचे नाव आहे. शिवराम टोला येथील महिला मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. ही फुले वेचत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हे पाहताच अन्य महिला जीवाच्या आकांताने पळाल्या. मात्र अनुसया या वाघाच्या हल्ल्यात सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गोठणगाव वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती.या घटनेनंतर गावात दहशत पसरली आहे. गोठणगाव वनविभागाने नागरिकांना जंगलात एकटे न जाण्याचे आवाहन केले आहे. वनविभागाकडून पीडित कुटुंबाला मदतीसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. परिसरात वाघाचा वावर लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यात येत आहेत.

मध्यंतरी वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला सध्याच्या हंगामात पहाटेच्या सुमारास मोहफुल वेचण्यासाठी जंगल परिसरात जाण्यास मनाई करणारे आदेश दिले होते. पण, मोहफुल रात्री गळून पडत असल्याने गावकरी पहाटेच मोहफुल वेचणीसाठी जातात. या घटनेनंतर गावकऱ्यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून पहाटे जंगलात जाणे टाळावे, असे आवाहन नवेगावबांधचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप पवार

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.