बस चालवताना मोबाईलवर IPL पाहणं महागात; ई-शिवनेरीचा ‘तो’ चालक बडतर्फ; एसटी महामंडळाची मोठी कारवाई.

कर्तव्यावर असताना आयपीएल सामना पाहाल, तर नोकरीला मुकाल, असा इशारा महामंडळाने एसटीतील चालकांना दिला आहे.राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ‘शिवनेरी’ बसचा चालक बस चालवताना आयपीएल टी-२० क्रिकेटचा सामना पाहत असल्याचे शनिवारी समोर आले. प्रवाशांच्या ही बाब निदर्शनास आल्यावर त्यांनी याविरोधात परिवहनमंत्र्यांकडे तक्रार केली. यानंतर महांडळाने चालकावर बडतर्फीची कारवाई केली आहे.कर्तव्यावर असताना आयपीएल सामना पाहाल, तर नोकरीला मुकाल, असा इशारा महामंडळाने एसटीतील चालकांना दिला आहे. दादर-स्वारगेट मार्गावर धावणारी ई-शिवनेरी गाडी दादर पूर्वेकडून स्वारगेटच्या दिशेने शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता मार्गस्थ झाली. ई-शिवनेरीमध्ये चालक खासगी कंपनीचे असतात. दादरवरून साधारण दीड तासात गाडी लोणावळा परिसरात पोहोचली. मात्र चालक केबिनमधून क्रिकेट सामन्याच्या समालोचनाचा आवाज येत असल्याने प्रवाशांनी अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी बसच्या स्टेअरिंगमागील स्पीडोमीटरवर मोबाइल ठेवून चालक ‘आयपीएल’ सामना पाहता होता.

विशेष म्हणजे, त्यावेळी गाडीचा वेग ताशी ६०-८० किमीदरम्यान होता. या धक्कादायक प्रकाराचे चित्रीकरण करून त्याचा व्हिडीओ प्रवाशांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवला. सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले.‘बस चालवत असताना मोबाइलचा वापर करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणे आणि बेशिस्त वाहन चालवल्याचा ठपका ठेवत संबंधित चालकाला बडतर्फ केले आहे. त्याचबरोबर खासगी चालक पुरवणाऱ्या संबंधित कंपनीलाही पाच हजारांचा दंड ठोठावला आहे,’ असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले.

‘शिवनेरी ही एसटीची मुंबई-पुणे मार्गावरील प्रतिष्ठित बससेवा आहे.‘अपघातविरहित सेवा’ हा या बससेवेचा नावलौकिक आहे. मात्र बेशिस्त वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. एसटीच्या प्रतिष्ठित सेवेबद्दल विश्वास दृढ होत जाईल,’ असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. ‘भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी खासगी चालक पुरवणाऱ्या संबंधित संस्थेने शिस्तबद्ध वाहन चालवण्याच्या प्रशिक्षणासह काय करावे आणि काय करू नये, याचे धडेही चालकांना देणे गरजेचे आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.