टीटीईनेच दिला लोकोपायलटला चोप, रेल्वे स्थानकात एकच गोंधळ, व्हिडिओ व्हायरल.

 नवजीवन एक्स्प्रेसने बडनेराला जाण्यासाठी लोको पायलट बल्लारशाह रेल्वे स्थानकावर पोहचला. लोको पायलटने ट्रेनच्या टीटीईकडे आरक्षित सीटची मागणी केली. यादरम्यान टीटीई आणि लोको पायलटमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.याचा शेवट हाणामारीत झाला.दोन रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. आरक्षित जागेच्या मुद्यावरुन लोको पायलट आणि टीटीई एकमेकांना भिडले. या घटनेत लोकोपायलट जखमी झाला आहे.बल्लारशाह रेल्वे स्थानकावर शनिवार (२२ मार्च) लोको पायलेट आणि टीटीई यांच्यात चांगलाच राडा झाला. नवजीवन एक्स्प्रेसने बडनेराला जाण्यासाठी लोको पायलट बल्लारशाह रेल्वे स्थानकावर पोहचला. लोको पायलटने ट्रेनच्या टीटीईकडे आरक्षित सीटची मागणी केली. यादरम्यान टीटीई आणि लोको पायलटमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.याचा शेवट हाणामारीत झाला. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ एका प्रवाशाने बनविला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या प्रकारची बल्लारशाह तक्रार लोहमार्ग पोलिसात दाखल करण्यात आली आहे.संतप्त झालेल्या इतर लोको पायलटांनी या घटनेचा निषेध नोंदवित लोको पायलट लॉबी समोर घोषणाबाजी केली. याप्रकरणी जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.प्राप्त माहितीनुसार,नवजीवन एक्स्प्रेस बल्हारशहा रेल्वे स्टेशनवर आली असता सहायक लोको पायलट अंकित घनश्यामदास बैरागी याने नवजीवन ट्रेनमधील टीटीई इंद्रजित मीणा यांच्याकडे बडनेरा येथे जाण्यासाठी आरक्षित सीटची मागणी रेल्वे अथॉरिटी पास दाखवून केली. त्या वरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. या वादाचा शेवट मारहाणीत झाला.

टीटीई  इंद्रजित मीणायाने चैनने सहायक लोको पायलट अंकित बैरागी यांना मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारला घडली होती. काही प्रवाश्यांनी या घटनेचा व्हिडिओ चित्रीत केला. हा विडिओ समाज माध्यमांत वायरल झाला आहे. या प्रकाराची माहिती रविवारी येथील लोको पायलट यांना मिळताच मोठ्या संख्येने लोको पायलट यांनी रेल्वे स्थानकावर निदर्शने केली.यात सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनचे सचिव पी.पी.आगे, एआयएलआरएसए युनियनचे झोनल सेक्रेटरी आनंदसिंग यादव यांच्यासह अनेक लोको पायलट सहभागी झाले होते. रेल्वेचे जीएम, डीआरएम यांना टीटीई इंद्रजित मीणा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या घटनेची पुनरावृत्ती झाल्यास रेल्वे बंद आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.