पुण्यात कंटेनरला धडकून स्विफ्टचा चक्काचूर, बापलेकीसह मामाचा जागीच मृत्यू, आई गंभीर.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये बाप लेकीचा समावेश असल्याचे समोर येत आहे. तर तिसरी व्यक्ती हा मुलीचा मामा होता. न्हावरे-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावर कंटनेर आणि स्विफ्ट गाडी यांची समोरासमोर धडक  झाली. या भीषण अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात न्हावरे येथे हा अपघात झाला. रविवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कंटनेर आणि स्विफ्ट कार यांची समोरासमोर भीषण धडक  झाली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये बाप लेकीचा समावेश असल्याचे समोर येत आहे. तर तिसरी व्यक्ती हा मुलीचा मामा होता.कैलास उर्फ दादा कृष्णाजी गायकवाड (वय ५० वर्ष), गौरी कैलास गायकवाड (वय १८ वर्ष) आणि गणेश महादेव निर्लेकर (वय २५ वर्ष) अशी आहेत. मुलीची आई दुर्गा कैलास गायकवाड (वय ४५) ही गंभीर जखमी झाली आहे.

अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्याचे काम सुरु आहे.याबाबत मिळाललेली माहिती अशी की, कैलास गायकवाड हे आपल्या चारचाकी वाहनातून या ठिकाणी येत होते. त्यांच्या स्विफ्ट गाडीला कंटनेरने जोरदार धडक दिली. या अपघातात कैलास गायकवाड व त्यांची मुलगी गौरी गायकवाड तसेच जवळचे नातलग गणेश निर्लेकर जागीच ठार झाले, तर कैलास गायकवाड यांच्या पत्नी दुर्गा कैलास गायकवाड गंभीर जखमी झाल्या आहेत.

रात्रीच्या वेळी वाघोली गावावरून आपल्या घरी येत असताना ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.एकाच कुटुंबातील तिघांच्या भीषण अपघाती निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पुढील शिरूर पोलीस करत आहेत. मृतांचे शवविच्छेद करण्यासाठी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने शिरूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.