वडिलांचा मृत्यू, पार्थिव घरी नेताना लेकाला हार्ट अटॅक, काळजाचं पाणी करणारा कुटुंबाचा आक्रोश.

एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांचं पार्थिव घरी नेताना मागून येणाऱ्या लेकाला वाटेत हार्ट अटॅक आला. एकाच दिवशी पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेने साऱ्यांचे मन हेलावून गेले आहे.एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांचं पार्थिव रुग्णालयातून घरी नेत असताना वाटेत त्याच्या मुलाला हृदय विकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यात त्याचाही मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील कानपूरमधून ही काळीज चिरणारी घटना समोर आली आहे. निधनानंतर वडिलांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी नेला जात होता. त्यांच्या मुलगा दुचाकीवरून रुग्णवाहिकेच्या मागून येत होता. यावेळी मुलगा अचानक पडला आणि पुन्हा उठलाच नाही. वडिलांच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने त्याला हृदयविकाराचा धक्का आल्याचं सांगितलं जात आहे.मुलाचं वडिलांबद्दलचं एवढं प्रेम पाहून सर्वांचे डोळे पाणावले. चमनगंज येथील रहिवासी लायक अहमद यांची प्रकृती बिघडली. त्यांची प्रकृती अगोदरच खराब होती मात्र गुरुवारी रात्री त्यांची तब्येत खालावली. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खासगी नर्सिंग होममध्ये नेले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले पण त्यांना वाचवण्यात यश आले नाही.

लायक यांचा मुलगा अतिक त्याच्या वडिलांवर खूप प्रेम करत होता. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे, तेव्हा त्याचा यावर विश्वासच बसला नाही. त्याने वडिलांना गाडीतून कार्डिओलॉजी हॉस्पिटलमध्ये नेले. त्याला असं वाटलं की त्याचे वडील जिवंत आहेत. मात्र, तिथेही डॉक्टरांनी लायक अहमदला तपासून मृत घोषित केले. आता तुझे वडील जिवंत नाहीत, त्यांचा मृत्यू झाला आहे, असं डॉक्टरांनी मुलगा अतिक याला सांगितले.त्यानंतर अत्यंत दु:खी झालेला अतिक आपल्या वडिलांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी नेत होता. यावेळी तो रुग्णवाहिके मागे आपल्या नातेवाईकासह दुचाकीवरून येत होता.

यादरम्यान आतिक अचानक खाली पडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी अतिकला मृत घोषित केले. अतिकला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.सर्वप्रथम लायकच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मुलगा अतिकचाही मृत्यू झाल्याचं कळालं. हे ऐकताच कुटुंबाने एकच आक्रोश केला. त्यानंतर अत्यंत संध्याकाळी वडील आणि मुलाची एकत्र अंत्ययात्रा निघाली. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले. या पिता-पुत्राची अंत्ययात्रा एकत्र काढण्यात आली आणि त्यानंतर दोघांवर एकत्रच दफनविधी करण्यात आली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.