फहीम खानच्या घरावर बुलडोजर, नागपूर मनपाची मोठी कारवाई.

नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड आणि मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान याच्या घरावर नागपूर महानगरपालिका बुलडोजर चालवत आहे. त्याच्या ३० वर्ष लीजवर घेण्यात आलेल्या घरात अनधिकृत बांधकाम करण्याचे लक्षात येताच ही तोडक कारवाई करण्यात येत आहे. संजयबाग येथील फहीमचे घर पूर्णपणे जमिनदोस्त करण्यात येत आहे. घराच्या पहिल्या मजल्यापासून ही तोडक कारवाई करण्यात येत आहे.नागपूर हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खान याच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेने याबाबत कारवाई केली आहे. नागपूरच्या टेकानाका परिसरात घर बांधताना फहीम खान याने अतिक्रमण केल्याचे दिसून येताच ते आज(२४ मार्च) हटवण्यात येत आहे. हे अतिक्रमण हटवण्याआधी नागपूर महानगर पालिकेने आरोपी फहीम खानच्या कुटुंबाला नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे आता नागपूर हिंंसाचार प्रकरणी फहीम खानच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.हिंसाचाराचा मास्टरमाईंड आणि मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान याच्या घरावर नागपूर महानगरपालिका बुलडोजर चालवत आहे. त्याच्या ३० वर्ष लीजवर घेण्यात आलेल्या घरात अनधिकृत बांधकाम करण्याचे लक्षात येताच ही तोडक कारवाई करण्यात येत आहे. संजयबाग येथील फहीमचे घर पूर्णपणे जमिनदोस्त करण्यात येत आहे. घराच्या पहिल्या मजल्यापासून ही तोडक कारवाई करण्यात येत आहे. सध्या त्याच्या घरात कोणीही नसून त्याचे नातेवाईक आपले बस्तान बांधून घराबाहेर पडले आहेत. या कारवाईवेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त पहायला मिळत आहे. पोलिसांनी परिसरात बॅरिकेड्स देखील लावले आहेत. कारवाई करतेवेळी परिसरात तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिस सतर्क आहेत.

सध्या आरोपी फहीम खानच्या घरातील वीज पुरवठा सुरु असून मनपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर तो पूर्णतः खंडित करण्यात येणार आहे. या तोडक कारवाईवरुन राज्य सरकारला, कोणीही कायद्यापेक्षा मोठा असू शकत नाही. सामाजिक सुरक्षा धोक्यात आणणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल हे सुचवायचे आहे.सोमवार १७ मार्चच्या रात्री नागपूरात हिंसाचार उसळला. या घटनेचा म्होरक्या फहीम खान याला अटक करुन त्याच्यासहीत अन्य सहा जणांवर देशद्रोहाचा गु्न्हा दाखल करण्यात आला. फहीमच्या अन्य बाबींचा तपास करताना त्याच्या संजयबाग येथील ३० वर्ष लीजवर घेण्यात आलेल्या घरात मोठ्याप्रमाणावर अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्याने नागपूर महानगरपालिकेने ही तोडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.