वाहतूक कोंडीने भाजप नेत्याची ‘सटकली’! संतापून पाडल्या दुचाकी; पिंपरीतील प्रकार ‘व्हायरल’.

बेशिस्त पार्किंग करणाऱ्या दुचाकीस्वारांना धडा शिकविण्यासाठी माजी नगरसेवकाने थेट रस्त्यावरील सर्व दुचाकी खाली पाडल्या. याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरलही केला. रस्त्यावर दुतर्फा उभ्या केलेल्या दुचाकी आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी पाहून भाजपच्या एका माजी नगरसेवकाचा संताप अनावर झाला. बेशिस्त पार्किंग करणाऱ्या दुचाकीस्वारांना धडा शिकविण्यासाठी माजी नगरसेवकाने थेट रस्त्यावरील सर्व दुचाकी खाली पाडल्या. याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरलही केला.’वाहतूक कोंडीने माझी सटकली, त्यामुळे माझ्यातील रुद्रावतार जागा झाला,’ असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पिंपरीतील काळभोरनगर येथे शनिवारी (२२ मार्च) ही घटना घडली. राजू दुर्गे असे वाहतूक कोंडीने संतापलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. काळभोरनगर येथे जाण्यासाठी एक छोटा रस्ता आहे. त्या रस्त्याने या भागातील नागरिक ये-जा करीत असतात. मात्र, गेल्या चार वर्षांपासून येथे एका दुचाकी विक्रेत्याचे शोरूम आणि सर्व्हिस सेंटर झाले आहे. या सेंटरमधील सर्व कामगारांच्या दुचाकी रस्त्याच्या दोन्ही बाजूने पार्क करण्यात येतात. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. चारचाकी वाहन जाऊच शकत नाही.

याबाबत स्थानिक नागिरकांनी आणि लोकप्रतिनिधींनी अनेकदा पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र, यावर कारवाई झाली नाही. दरम्यान, माजी नगरसेवक राजू दुर्गे शनिवारी पत्नीला रुग्णालयातून घरी आणत होते. त्या वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुचाकी उभ्या केलेल्या होत्या. त्यामुळे अर्धा तास त्यांना वाहतूक कोंडीत अडकावे लागले. शेवटी संताप अनावर झाल्याने ते गाडीतून खाली उतरले आणि सर्व दुचाकी पाडल्या. पुन्हा येथे वाहने लावल्यास फोडून टाकू, असा सज्जड दमही त्यांनी भरला.दुर्गे यांनी शनिवारी संतापून सर्व दु‌चाकी पाडल्या नंतर रविवारी या रस्त्यावर कोणीही दुचाकी लावली नाही. यामुळे संपूर्ण रस्ता रिकामा होता. याबाबत दुर्गे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये दुचाकी शोरूम आणि सर्व्हिस सेंटरसमोरील सर्व वाहने पाडताना दिसत आहेत. त्यांनी पोस्टमध्ये, ‘वाहतूक कोंडीने माझी सटकली, त्यामुळे माझ्यातील रुद्रावतार जागा झाला…’ असे म्हटले आहे.काळभोरनगर येथे जाण्यासाठी एकच छोटा रस्ता आहे. गेल्या चार वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. एका कंपनीचे कामगार रस्त्यावर दुतर्फा वाहने लावतात. कंपनीत साहित्य घेऊन येणारे टेम्पोही रस्त्यावर उभे राहतात. या प्रकारमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा होतो. वारंवार सूचना देऊनही कामगार वाहने दुसरीकडे लावत नाहीत. माझ्या प्रभागातील नागरिकांना रोजच याचा त्रास होत होता. त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे संतापून मी हा प्रकार केला. – राजू दुर्गे, माजी नगरसेवककाळभोरनगर येथे रस्त्यावर उभी केलेली वाहने माजी कगरसेवकाने पाडली. या प्रकाराबाबत कोणीही तक्रार केलेली नाही; तसेच या घटनेत कोणतेही नुकसान झालेले नाही. जर कोणी तक्रार दिली तर त्याची दखल घेतली जाईल; तसेच संबंधित कंपनीला रस्त्यावर वाहने उभी करू नयेत, या बाबतची नोटीस बजावण्यात आली आहे. –अशोक कडलक, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, पिंपरी

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.