कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तयार केलेल्या कवितेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तणाव निर्माण झाला आहे. कुणाल कामरा विरोधात अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. शिवसैनिकांनी आंदोलनाचा इशारा दिला असून कामरा याने माफी मागण्याची मागणी केली आहे.कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर कविता तयार केलीये. ज्यानंतर राज्याचे राजकारण तापताना दिसतंय. कुणाल कामरा याच्या या कवितेचा व्हिडीओ संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली. आता शिवसेना आक्रमक होताना दिसतंय. आपल्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा कुमाल कामरा यांनी साधला. कुणाल कामराविरोधात अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











