अपहरण करुन हत्या, नंतर खंडणीचा बनाव रचला; ९ दिवसांनी असा झाला उलगडा, वाशिम हादरलं.

वाशिममध्ये एका मुलाचं अपहरण करुन नंतर त्याची हत्या केल्याची घडना घडली असून याप्रकरणात ९ दिवसांनी उलगडा झाला आहे. खंडणीचा बनाव रचून पोलिसांना भरकटवण्यात आलं, अखेर घटना उघडकीस आली.वाशिममधून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. बाभूळगाव येथील अनिकेत सादुडे या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचं अपहरण झालं होतं. मुलगा १२ मार्चच्या रात्री बेपत्ता झाला होता. गावात रात्री नांनमुखाच्या कार्यक्रमादरम्यान अनिकेत डिजेवर नाचण्यासाठी गेला. त्यानंतर तो घरी आलाच नाही. त्यानंतर सादुडे कुटुंबीयांनी वाशिम पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवत अनिकेतच्या शोधार्थ ९ पोलीस पथक रवाना केली होती. तसंच घटनास्थळी डॉग स्कॉड पाचारण करत गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. याचदरम्यान अनिकेतच्या घराबाहेर एक बंद लिफाफ्यात ५ पानी पत्र लिहत ६० लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आल्याचं पत्र मिळालं. पोलिसांना माहिती देऊ नका, असा या पत्रात उल्लेख केला होता. तेव्हापासून पोलीस यंत्रणा अनिकेतसह आरोपीची माहिती गोळा करत होते.वाशिमच्या बाभूळगाव येथील अनिकेत सादुडे हा १४ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या घरासमोर ६० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचं पत्र आढळून आलं होतं.

या प्रकरणी पोलीस मागील नऊ दिवसांपासून अनिकेतचा शोध घेत होते. मात्र शोधादरम्यान अनिकेतचा मृतदेह आढळून आला आणि एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेतचं अपहरण केल्यानंतर अवघ्या अर्धा तासातच पूर्ववैमन्यासातून अनिकेतचा गळा दाबून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर गावाजवळच असलेल्या निर्जन ठिकाणी दगडांच्या खाली त्याचा मृतदेह लपवण्यात आला होता. तसंच पोलिसांचं हत्येच्या घटनेपासून लक्ष विचलित व्हावं यासाठी आरोपींनी पाच पानी पत्र लिहून ६० लाखाची खंडणी मागितली होती. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा अनिकेतच्या घराजवळ राहणार वीस वर्षीय प्रणय पदम असल्याचं समोर आलं आहे.

त्याला गावातीलच शुभम इंगळे या तरुणाने अनिकेतचं अपहरण करण्यासाठी मदत केली होती.अनिकेतचा खून केल्यानंतर पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने वळवण्यासाठी आणि संभ्रम निर्माण करण्यासाठी आरोपींनी बनाव रचला. त्यांनी अपहरणाचं, खोट्या खंडणीचं पत्र अनिकेतच्या घरासमोर ठेवलं होतं. मात्र, पोलिसांच्या तपासामुळे हा कट उघडकीस आला आणि आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या.अनिकेतचं १२ मार्च रोजी अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात गावातल्याच २० वर्षीय दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन या हत्येचा छडा लावला. मात्र आता अनिकेतच्या वडिलांनी या प्रकरणात मुख्य सूत्रधार वेगळा असल्याची शंका उपस्थित केली असून ही केस सीबीआय किंवा सीआयडीकडे देऊन मुख्य सूत्रधाराला अटक करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.