प्रति, गट विकास अधिकारी (उ.श्रे.) पंचायत समिती, दिंडोरी, जि. नाशिक.
विषयः मौजे पालखेड (बं.) ता. दिंडोरी जि. नाशिक येथील गट नं. 326 मधील मुसलमान समाजाच्या दफन भूमीच्या नावाखाली केलेल्या अतिक्रमणा बाबत सादर केलेल्या चौकशी अहवालाबाबत. संदर्भ: 1. या कार्यालयाचे पत्र क्र. जिपना/ग्रापं/तक्रार-1/2025/E1041923, दि. 06.01.2025. 2. आपले पत्र क्र. पंसदिं/ग्रापं/183/2024, दि. 05.03.2025. उपरोक्त संदर्भ पत्र क्र. 01 अन्वये मौजे पालखेड बंधारा ता. दिंडोरी येथील गट नं. 326 मधील मुस्लिम समाजाच्या दफन भूमीच्या नावाखाली केलेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने गटस्तरावरुन चौकशी करुन, संबंधितांच्या तक्रारीचे निवारण करणेबाबत नियमोचित कार्यवाही करणेबाबत तसेच चौकशीअंती प्रकरणी अनियमितता आढळून आल्यास, त्याबाबत संबंधितांची जबाबदारी निश्चित करुन, त्यांचेविरुद्ध नियमानुसार प्रशासकीय सादर करणेबाबत आपणांस कळविण्यात आले होते.
02. त्यानुसार आपले स्तरावरुन सहायक गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी (ग्रा.पं.), पंचायत समिती, दिंडोरी चौकशी केलेली असून, सदर चौकशीचा अहवाल संदर्भ पत्र क्र. 02 अन्वये या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. सदर अहवालावरील आपण नोंदविलेल्या निष्कर्षांचे अवलोकन केले असता, मुद्दा क्र. 01 ते 03 चे बाबतीत अनियमितता झालेली असल्याचे आढळून येत असलेबाबत निष्कर्ष नमूद केलेले आहेत.
03. यास्तव, विषयांकीत प्रकरणी सदर अतिक्रमण संदर्भात आपले अहवालातील नमूद बाबनिहाय आढळून आलेल्या अनियमिततेसाठी जबाबदार असणाऱ्या संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यात येवून, त्यांचेविरुद्ध नियमानुसार प्रशासकीय कार्यवाहीचा प्रस्ताव आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय व पुराव्याच्या दस्तऐवजांसह तात्काळ मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांचेकडे सादर करावा.(डॉ. वर्षा फडोळ ) Qins 18 उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.)जिला परिषद, नासिक










