हरिद्वारात मेरठसारखं हत्याकांड,पत्नीनं पतीला पंजाबहून बोलावलं अन्.., पोलिसांनी कसा लावला छडा.

मेरठ हत्याकांडांने देशात खळबळ उडाली असताना आता असेच हत्याकांड हरिद्वारमधून समोर आले आहे. इथे ही मुस्कान, साहिल आणि सौरभ यांच्यासारखे प्रकरण घडले आहे. मेरठ प्रमाणेच कट रचण्यात आला आहे.मेरठ हत्याकांडांने देशात खळबळ उडाली असताना आता असेच हरिद्वारमधून समोर आले आहे. इथे ही मुस्कान, साहिल आणि सौरभ यांच्यासारखे प्रकरण घडले आहे. मेरठ प्रमाणेच कट रचण्यात आला आहे. इथे एका पत्नीने आपल्या पतीला पंजाबहूनबोलावले. मात्र हा त्याच्यासाठी शेवटचा प्रवास ठरला आहे.हरिद्वारमध्ये शाहपूर येथील गुरुद्वारा सेवादाराच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे जे मेरठच्या हत्याकांडाशी मिळते जुळते आहे. या प्रकरणात मृत व्यक्तीच्या पत्नीने पूर्ण कट रचला होता. सुखपालला अमृतसरवरुन हरिद्वारला त्याची पत्नी रितूने बालावले आणि त्यानंतर तिने तिचा प्रियकर ऋतिकला सोबत घेत त्याची निर्घृण हत्या केली.पोलिसांच्या तपासात समोर आले की, सुखपाल अमृतसरला राहून एका गुरुद्वारेत सेवादाराची नोकरी करत होता. त्याची पत्नी रितू आपल्या दोन मुलांसह हरिद्वारच्या जवळील गावात राहत होती. सुखपालचा मोठी मुलगा १५ वर्षाचा आहे.

काही काळापूर्वी रितूची भेट ही ऋतिकशी झाली. यानंतर त्यानंतर संपर्क वाढला त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. हे अवैध संबंध अनेक दिवसांपासूनऋतिकचे वय हे ३० वर्ष होते तर रितू ४० वर्षाची होती. त्यांच्यातील या अवैध संबंधात रितूचा पती सुखपाल हा अडथळा बनला होता. त्यामुळे रितूने पंजाबमध्ये नोकरी करणाऱ्या सुखपालला बोलवले आणि प्रियकरासोबत तोंड दाबून त्याची हत्या केली. १८ मार्चला सुखपालचा मृतदेह शेतात आढळला. सुखपालच्या भावाने याबाबत अज्ञात व्यक्तींच्या विरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या हत्याकांडाच्या तपासासाठी अनेक पथके तयार केली. क्राइम इंटेलिजन्स युनिटची तांत्रिक बाबींमध्ये मदत घेत पोलिसांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले तसेच आजूबाजूच्या लोकांना विचारणा केली. डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांना अखेर पत्नी रितू आणि ऋतिक यांच्यावर संशय निर्माण झाला. त्यामुळे पोलीसांनी त्यांची चौकशी केली त्यावेळी त्यांना रितू आणि ऋतिक यांच्यातील अवैध संबंध समोर आले. दोघांनी मिळून सुखपालला संपवले त्यासाठीचा कट कळाला. त्यानंतर पोलिसांनी सुखपालची पत्नी रितू आणि तिचा प्रियकर ऋतिकला अटक केली.दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.