कामासाठी घरातून निघाले ते परतलेच नाहीत, कार नदीपात्रात कोसळली आणि भयंकर घडलं; संपूर्ण गाव हळहळलं.

कार नदीपात्रात कोसळून व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली असून त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.गुहागर तालुक्यातील शृंगारतळी – आबलोली मार्गावर कोतळूक येथे भीषण अपघात झाला आहे. क्रेटा वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या नदीपात्रात कोसळून दुर्दैवी घटना घडली. या अपघातामध्ये वेळंब येथील अभय मेडिकलचे मालक अभय अरविंद ओक (वय ५१) यांचा दुर्दैवीरित्या अपघाती मृत्यू झाला आहे. अभय ओक कोतळूक येथून गुहागरकडे कामानिमित्त निघाले होते, त्यावेळी वाटेत हा दुर्दैवी अपघात घडला.अभय ओक यांचं कोतळूक येथे मेडिकल दुकान, जनरल स्टोअर आणि चिरेखाणीचा व्यवसाय आहे. परिसरातील सुप्रसिद्ध व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. आज शनिवारी, २२ मार्चला ते घरातून कामानिमित्त गुहागर येथे निघाले होते, मात्र पुन्हा घरी परतलेच नाहीत.

त्यांच्या जाण्याने ओक कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.गुहागर तालुक्यातील कोतळूक मांडवकरवाडी येथे सकाळी ११ वाजताच्या दरम्यान हा अपघात घडला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने क्रेटा वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन रस्त्याशेजारी असलेल्या नदीपात्रात कोसळलं. या अपघातामध्ये अभय ओक यांच्या डोक्याला जबर मार बसला होता. अपघाताची माहिती मिळताच तातडीने त्यांना अपघातस्थळावरुन शृंगारतळी येथील डॉक्टर सचिन ओक यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

डॉक्टरांना अभय ओक यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. बेशुद्ध अवस्थेत असलेले अभय ओक काही काळ उपचारांना थोडा प्रतिसाद दिला होता. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी डेरवण येथे नेण्यात आलं. पण डेरवण येथे पोहोचून उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. अभय ओक यांचा मृत्यू झाल्याचं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केलं.अभय ओक यांचं आबलोली येथे मेडिकल दुकान आहे. मूळचे वेळंब येथील असलेल्या अभय ओक यांची मोठी बागायत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी असं मोठं कुटुंब आहे. त्यांच्या अशा अकाली जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.