लग्नाच्या चार महिन्यात डॉक्टर महिलेचा मृत्यू, हातावर इंजेक्शनच्या निशाणाने संशय वाढला; काय घडलं.

 डॉक्टर महिलेचा लग्नाच्या केवळ चार महिन्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.एका महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. डॉक्टर महिलेचं केवळ चार महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. लग्नाच्या काही महिन्यांतच महिलेच्या झालेल्या मृत्यूने पोलिसांकडून अधिक संशय व्यक्त केला जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर महिला मूळची लखनऊची होती. तिचं चार महिन्यांपूर्वी भोपाळमधील एका डेंटिस्टशी लग्न झालं होतं. महिला भोपाळमध्ये एका मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टेंट प्रोफेसर म्हणून काम करत होती.गुरुवारी महिलेचा निधन झालं, त्यादिवशी पती-पत्नी दोघंही वेगवेगळ्या खोलीमध्ये झोपले होते. शुक्रवारी पतीने आपल्या पत्नीच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, त्यावेळी तिने आतून कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर शेजारच्यांना बोलवण्यात आलं. अनेकांनी आवाज देऊन किंवा दरवाजा ठोठावूनही दरवाजा आतून उघडला नाही. कोणतीच हालचाल आतून न आल्याने अखेर दरवाजा उघडणाऱ्या व्यक्तीला बोलवण्यात आलं.

त्याने दरवाजा तोडला आणि आतील दृष्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर महिला बेडवर निपचित पडलेली दिसली. तिची कोणतीही हालचाल होत नव्हती.त्यामुळे महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांना तपासात महिलेच्या हातावर इंजेक्शनचे निशाण आढळले आहेत. सध्या महिलेचा मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे. महिलेचा मृतदेह शनिवारी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

मुलीच्या वडिलांनी आपली मुलगी आत्महत्येचं पाऊल उचलू शकत नाही, तिच्या शरीरावर निळ्या रंगाचे निशाण असून तिला विष देऊन तिची हत्या केल्याचा आरोप त्यांनी सासरच्या लोकांवर केला आहे.सध्या पोलीस याप्रकरणी कसून तपास करत आहेत. महिलेने आत्महत्या केली, की हत्या करण्यात आली आहे या दृष्टीनेही तपास सुरू केला आहे. महिलेच्या हातावरील इंजेक्शनच्या निशाणाने पोलिसांचा संशय वाढला असून याप्रकरणी सर्व प्रकारे तपास सुरू आहे. महिलेच्या शवविच्छेदन अहवालानंतरच महिलेच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. मात्र लग्नाच्या केवळ चार महिन्यात डॉक्टर पती – पत्नीचा संसार अशाप्रकारे उद्धवस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.