ठाण्यात उन्हाच्या झळांपासून रक्षण करण्यासाठी सिग्नलवर कापडी जाळीचे आच्छादन, महानगरपालिकेचा उपक्रम.

वाढत्या उन्हापासून काहीसा दिलासा मिळण्यासाठी तीन हात नाक्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर जाळीचं आच्छादन टाकण्यात आलं आहे. नागपूर, पुण्यानंतर ठाण्यातही हा प्रयोग करण्यात आला आहे.उन्हाच्या तीव्र झळांनी ठाणेकर घामाघूम झालेले असताना ठाण्यातील मुख्य सिग्नलवर उन्हाच्या त्रासातून दिलासा मिळण्यासाठी कापडी जाळीचे आच्छादन टाकण्यात आले आहे. वाहन चालकांना सिग्नलच्या प्रतिक्षेत उभे असताना उन्हाचा त्रास जाणवू नये म्हणून ठाणे महानगरपालिकेतर्फे प्रायोगिक तत्वावर गोखले रोडवरून तीन हात नाक्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हे जाळीचे आच्छादन टाकण्यात आले असून नागपूर आणि पुणे शहरांनंतर ठाण्यात हा प्रयोग करण्यात आला आहे.राज्यात उन्हाचा प्रकोप लक्षात घेता विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

मार्च महिन्यातच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अद्याप दोन ते अडीच महिने या उन्हाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ठाण्यातील तीन हात नाका सिग्नल येथे कापडी जाळीचे आच्छादन टाकण्यात आहे. एखाद्या समारंभासाठी उभारल्या जाणार्‍या मंडपासारखी ही रचना असून ही जाळी १०० फूट लांब, २५ फूट रुंद आहे. तिची उंची रस्त्यापासून २० फूट इतकी असून या जाळीमुळे वाहन चालकांना उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. विशेषत: दुचाकीस्वार आणि सायकलस्वारांना या आच्छादनामुळे सिग्नलवर उन्हापासून संरक्षण मिळणार आहे.

येत्या काळात आणखी काही ठिकाणी अशाप्रकारे जाळी उभारण्याचा ठाणे महानगरपालिकेचा मानस आहे. तीन हात नाका सिग्नलवर दीड ते दोन मिनिटे वाहनांना प्रतिक्षा करावी लागते. या काळात अशा उपाययोजनांमुळे ठाणेकरांचा उन्हापासून बचाव होणार आहे.नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर पुण्यात विविध चौकांमध्ये २०१९ पासून असे छत उभारण्यात आले होते. आता या प्रयोगाचे ठाणेकरांनी कौतुक केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.