‘हॅप्पी होळी’ म्हणत स्वच्छता कर्मचाऱ्यास पेटवलं; कारण ठरली दारु, नाशिक बसस्थानकात नेमकं काय घडलं.

बस ​​स्थानकाच्या आवारात पुन्हा येऊ नको, असे संशयिताला बजावल्याने त्याने कर्मचाऱ्यावर पेट्रोल टाकून जाळल्याची माहिती तपासात समोर येत आहे.सतत कोणत्यातरी कारणातून वाद घालणाऱ्या व्यक्तीला मद्यपी तरुणाने ‘हॅप्पी होळी’ म्हणत थेट पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शहराच्या मध्यवर्ती भागातील ठक्कर बाजार बसस्थानकात शुक्रवारी रात्री घडली. यात बस स्थानकाच्या स्वच्छतागृहातील कर्मचारी विजय गेहलोत (वय ५४, रा. देवळाली कॅम्प) हे साठ टक्के भाजले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गेहलोत यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा संशयित शुभम जगताप (वय २२) याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे.

सरकारवाडा पोलिसांत शनिवारी (दि. २२) पहाटे अडीच वाजता संशयित शुभम जगताप याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. त्याने ठक्कर बाजार बसस्थानकात स्वच्छता कर्मचाऱ्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर येत आहे. स्वच्छता कर्मचारी असलेल्या गेहलोतने संशयिताला हटकल्याने त्याने बाहेर जाऊन प्लास्टिकच्या पिशवीत पेट्रोल आणले. ते कर्मचाऱ्याच्या अंगावर टाकून ‘हॅप्पी होळी’ म्हणून सिगारेट पेटविण्याच्या लायटरने आग लावली.

‘बस स्थानकाच्या आवारात पुन्हा येऊ नको’, असे संशयिताला बजावल्याने त्याने कर्मचाऱ्यावर पेट्रोल टाकून जाळल्याची माहिती तपासात समोर येत आहे.दरम्यान , बस स्थानकात विजय गेहलोत सफाईचे काम करीत होते . संशयिताला कोणीही नातलग नसल्याने तो ठक्कर बाजार परिसरातील एका खोलीजवळ रात्री मुक्काम करायचा. दिवसभर परिसरातील हॉटेलात किंवा इतरत्र किरकोळ कामे करून तो उदरनिर्वाह करतो . संशयिताचे व गेहलोत याचे कोणत्यातरी कारणातून कायम वाद व्हायचे. त्या रागातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.