राष्ट्रीय लोक अदालतीत ११,०८१ प्रकरणे निकाली; ३१.५५ कोटींची वसुली.

राष्ट्रीय लोक अदालतीत ११,०८१ प्रकरणे निकाली; ३१.५५ कोटींची वसुली. जळगाव दि. 23 मार्च ( जिमाका वृत्तसेवा ) जिल्हा न्यायालय व अन्य न्यायालयांमध्ये दिनांक २२ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. न्यायालयातील प्रलंबित व दाखलपूर्व मिळून एकूण ११,०८१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून ३१,५५,७६,९३९/- रुपयांची वसुली करण्यात आली.

या लोक अदालतीमध्ये ९,२७६ दाखलपूर्व आणि १,८०५ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तसेच १९ ते २१ मार्च दरम्यान झालेल्या विशेष मोहिमेत आणखी ६८१ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

मा.  एस. एन. राजुरकर, प्र. अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा न्यायाधीश-१ जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत यशस्वी झाली. सर्व न्यायाधीश, वकिल, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार यांच्या सहकार्याने या उपक्रमाला मोठे यश लाभले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.