रावेर तालुक्यात १५ किमी शेत रस्ते मोकळे; ७५० हून अधिक शेतकऱ्यांना दिलासा.

रावेर तालुक्यात १५ किमी शेत रस्ते मोकळे; ७५० हून अधिक शेतकऱ्यांना दिलासा. जळगाव रावेर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधील शेत रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून १५ किलोमीटर लांबीचे रस्ते मोकळे करण्यात आले, त्यामुळे ७५० हून अधिक शेतकऱ्यांना शेतीसाठी वाहतुकीचा मार्ग सुकर झाला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार महसूल प्रशासनाने ही मोहीम राबवली. गेल्या काही वर्षांत या भागातील शेत रस्त्यांवर अनधिकृत अतिक्रमण झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रशासनाने तातडीने पावले उचलत ही अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेतली.

तहसील प्रशासन, महसूल विभाग व पोलीस दलाच्या संयुक्त कारवाईत १५ किलोमीटर लांबीचे शेत रस्ते मोकळे करण्यात आले, ज्याचा थेट फायदा ७५० हून अधिक शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांनी दिली.या मोहिमेमुळे शेतकरी वर्गाला शेतीसाठी आता अधिक सुलभ आणि मोकळा मार्ग उपलब्ध झाला आहे. भविष्यातही अशाच प्रकारे सातत्याने कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.निभोरा मंडळ,खिर्डी मंडळ, सुनोदा शेतरस्ता, खानापुर मंडळ, खानापुर निरुळ शिवरस्ता, खिडी मंडळ, सुनोदा शेतरस्ता, सावदा मंडळ, उदळी लुमखेडा शिव रस्ता, खानापुर मंडळ, अजनाड जुने गावठाण, ऐनपुर मंडळ, धामोडी शेतरस्ता, ऐनपुर मंडळ, धामोडी शिगांडी शिवार, अजंदा ते नांदुखेडा शिवरस्ता या ठिकाणचे शेत रस्त्यातील अतिक्रमण काढण्यात आली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.