भाजप नेत्याचा कुटुंबावर गोळीबार, तीन लेकरांचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी, मोठी खळबळ.

 भाजप नेत्याने आपल्या स्वतःच्या कुटुंबावर गोळीबार केला. या घटनेत त्याची एक मुलगी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ निर्माण झाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलीये. पुढील तपास पोलिस करत आहेत.एक अतिशय धक्कादायक अशी घटना ही पुढे येताना दिसतंय. एका भाजप नेत्याने स्वत: च्याच कुटुंबावर गोळीबार केला. हैराण करणारे म्हणजे त्याच्या या गोळीबारात त्याचीच एक मुलगी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झालीये. भाजपाच्या नेत्याने घरातच अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली असता सर्वजण हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे बघायला मिळाले. यावेळी भाजपाचा नेता बाजूलाच उभा दिसला.

हैराण करणारे म्हणजे आपल्याच कुटुंबावर गोळीबार करून त्याने पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती देत आपणच गोळीबार केल्याचेही सांगितले. आरोपीने आपल्या परवानाधारक बंदुकीतून हा गोळीबार केला. या भाजपाच्या नेत्याचे नाव योगेश रोहिला असून तो भाजप युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे घडली. या घटनेनंतर आता विविध चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळतंय.शेजारी या गोळीबाराचा आवाज ऐकून घटनास्थळी येताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांना त्याला पोलिस येऊपर्यंत पकडून ठेवले आणि मारहाण केली. मुलगी श्रद्धा, शिवांश आणि देवांश यांचा या गोळीबारात मृत्यू झाला. आरोपी योगेश रोहिला याची पत्नी नेहा यांच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत, त्या गंभीर जखमी झाल्या असून त्या मृत्यूशी झुंज देत आहेत. शनिवारी साधारण दुपारी तीनच्या अंदाजात त्याने हा गोळीबार केला.या गोळीबाराच्या घटनेनंतर आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. अनेकांचे म्हणणे आहे की, गेल्या काही दिवसांपासून योगेशची मानसिक स्थिती व्यवस्थित नव्हती आणि यातूनच त्याने हा गोळीबार केला. काहींचे म्हणणे आहे की, योगेश रोहिला हा पत्नीवर संशय घेत होता आणि त्यातूनच त्याने हा गोळीबार केला. पोलिसांनी योगेश रोहिला अटक केलीये. पोलिस हे या प्रकरणातील पुढील तपास करत आहेत. काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.