सांभाळून घ्या! दिशा प्रकरणात आदित्यसाठी उद्धवजींचा फोन आलेला; राणेंनी शब्द न शब्द सांगितला.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात आदित्यच नाव घेऊ नका, अशी विनंती करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दोन फोन केल्याचा पुनरुच्चार माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणेंनी पुन्हा एकदा केला. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात आदित्यच नाव घेऊ नका, अशी विनंती करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दोन फोन केल्याचा पुनरुच्चार माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणेंनी पुन्हा एकदा केला. ठाकरेंसोबत फोनवरुन झालेल्या संवादातील शब्द न शब्द यावेळी त्यांनी सांगितला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.उद्धव ठाकरेंचा पहिला फोन आला तेव्हा मी मुंबईत होतो. वांद्रे ओलांडून माझ्या जुहूतील घरी जात असताना मला ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकरांचा फोन आला होता, अशी माहिती राणेंनी दिली. ‘दादा साहेबांना बोलायचंय, असं नार्वेकर म्हणाले. मी म्हटलं कोण साहेब? त्यावर नार्वेकर म्हणाले उद्धवजी. ते गाडी चालवताहेत. त्यांना तुमच्याशी बोलायचंय, असं नार्वेकर म्हणाले.

त्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्या फोनवरुन माझ्याशी बोलले, असा संवाद राणेंनी सांगितला.’तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत. सध्या तुम्ही ते प्रेसशी बोलताना आदित्यचं नाव घेता, त्याच्या नावाचा उल्लेख करु नये अशी विनंती करायला मी फोन केल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. मी म्हटलं, उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा. अमुक ठिकाणी अमुक विषयात कोण आहेत याचा उल्लेख मी केलेला नाही. एका निरपराध मुलीची अत्याचार करुन हत्या झालीय. त्या प्रकरणातील दोषींना अटक व्हावी अशी माझी भूमिका आहे आणि तीच मी मांडतोय. त्यात कोणतीही तडजोड नाही, असं मी उद्धवजींना सांगितलं,’ असं राणे म्हणाले.’तुम्ही आता तुमच्या मुलाचं नाव घेतलं. तो संध्याकाळी जिथे जातो, त्याला सांभाळा. सांगा त्याला ते बरं नाही. माझ्या घराजवळ तो दिनो मोरियो राहतो. त्याच्या घरात संध्याकाळी तीन-चार तास काय धुमाकूळ घालतात याबद्दल मला माहिती आहे. पण आता तुम्हाला ते सांगणार नाही. म्हणून मी उद्धवजींना सांगितलं की त्याला सांभाळा. त्यावर पाहतो, सांगतो असं उद्धवजी म्हणाले. तुम्ही जरा सहकार्य करा, अशी विनंती त्यांनी केली,’ असा संवाद त्यांनी सांगितला.’दुसरा फोन कोविड काळात झाला. त्यावेळी माझ्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. तेव्हा एक परवानगी राज्य सरकारकडून हवी होती. त्यावेळी उद्धवजींचा फोन आला होता. तुम्ही मला फोन केला होता का, अशी विचारणा त्यांनी समोरुन केली. मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी फोन केला होता, असं मी त्यांना सांगितलं. साहेब ती परवानगी मिळेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण तुम्ही प्रेस घेताना जरा तो उल्लेख टाळलात तर बरं होईल, असं म्हणाले. त्यावर तुम्ही म्हणता त्याचं नाव मी घेतलेलं नाही. एक मंत्री त्यावेळी तिथे होता, असं मी म्हणतोय आणि तो व्हिडीओमध्ये आलेला आहे, असा संवाद आमच्यात झाला. असे दोन फोन त्यांनी मला केले होते,’ अशी माहिती राणेंनी पत्रकार परिषदेत दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.