बापाने आईला मारलं, लेकाला संताप अनावर झाला, आणि नको तेच घडलं.

 दारूच्या नशेत वडिलांनी आईला अमानुष मारहाण केली. त्यामुळे चिडलेल्या मुलाने वडिलांची दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना चिखली तालुक्यातील धोत्रा नंदई येथे २१ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली असून, आरोपी मुलाला अमडापुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दारूच्या नशेत वडिलांनी आईला अमानुष मारहाण केली. त्यामुळे चिडलेल्या मुलाने वडिलांची दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना चिखली तालुक्यातील धोत्रा नंदई येथे २१ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली असून, आरोपी मुलाला अमडापुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबतची फिर्याद सुनील गणेश भांडवले वय २३ वर्ष याने अमडापूर पोलिस स्टेशनला दिली. त्याने नमूद केले की, तोंडी रिपोर्ट देतो की मी वरील ठिकाणी आई वडिलांसह राहण्यास असून शेतीचे काम, मजुरी करून उदरनिर्वाह करतो. माझे काका सुरेश रमेश भांडवले यांना दारू पिण्याचे व्यसन होते.

व दारू पिऊन ते नेहमी माझे चुलत भाऊ, बहीण, काकू यांना शिवीगाळ व मारहाण करायचे २१ मार्च रोजी अंदाजे १ वाजताच्या सुमारास नारायण बोराडे यांच्या शेतात ट्रॅक्टरने रोटावेटर करत असताना सरपंच भीमसेन सरसंडे यांनी फोन करून, तुझे काका सुरेश भांडवले व चुलत भाऊ आनंद सुरेश भांडवले यांचे भांडण झाले असून तुझे काका यांचे डोक्यात आंनद ने दगड मारल्याने ते जखमी अवस्थेत पांदण रस्त्यावर, गणेश उखंडा पटारी यांच्या गोठ्यासमोर पडले आहेत.मी धावतच तेथे जाऊन बघितले असता गोठ्या समोरील पांदण रस्त्याच्या मधोमध काका निपचित अवस्थेत पडलेले व त्यांच्या चेहऱ्यावर रक्त व डोके फुटलेले दिसले. त्यांच्या बाजूला चुलत भाऊ आनंद सुरेश भांडवले हा बसलेला दिसला. मी काका सुरेश भांडवले यांना उठवण्याचा प्रयत्न करत असतांना चुलत भाऊ आनंद भांडवले म्हणाला की ते आता उठणार नाही. दारू पिऊन नेहमी खूप त्रास द्यायचा म्हणून मी त्यांच्या डोक्यात दगड टाकून त्याला कायमचं झोपवलं. त्यांचा खून केला आहे असे म्हणाला.त्यावेळी तेथे असलेले सरपंच भीमसेन सरसंडे व इतर लोक यांनी सुद्धा माझे काका सुरेश भांडवले हे मरण पावल्याचे सांगितले. मी काका सुरेश भांडवले यांच्याजवळ जाऊन बघितले असता काका सुरेश भांडवले हे मयत झाल्याची माझी खात्री झाली. आनंद सुरेश भांडवले वय १७ वर्षे याने काका सुरेश रमेश भांडवले अंदाजे वय ४२ वर्षे हे दारू पिऊन घरातील लोकांना शिवीगाळ मारहाण करून त्रास देत असल्याने आनंद भांडवले याने काका सुरेश रमेश भांडवले यांच्या डोक्यात दगड मारून त्यांचा खून केला. असे सुनिल भांडवले याने सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.