अमळनेर हद्दीतील 15 गंभीर गुन्ह्यांचा गतीने तपास; पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून गौरव.

अमळनेर हद्दीतील 15 गंभीर गुन्ह्यांचा गतीने तपास; पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून गौरव


अमळनेर : गंभीर गुन्ह्यांचा गतीने तपास करून आरोपींना अटक करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी रोख रक्कम देऊन सन्मान केला. अमळनेर पोलिस ठाण्याच्या तपासणीसाठी पोलिस अधीक्षक अमळनेर येथे आले होते.महिला अत्याचार अंतर्गत व विविध गंभीर १५ गुन्ह्यांचा गतीने तपास केला. तसेच आरोपींना तत्काळ अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले म्हणून पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, पोलिस कर्मचारी विनोद सोनवणे, नितीन मनोरे यांना रोख बक्षीस देऊन सन्मानित केले.त्याचप्रमाणे पोलिस कर्मचारी गणेश पाटील, सिद्धांत शिसोदे यांनी गोपनीय अहवाल अद्ययावत ठेवला, दप्तर सुरळीत ठेवल्याबद्दल बक्षीस देऊन सन्मान केला. एमपीडीए प्रस्ताव अचूक व कायदेशीर तयार केला म्हणून अनेक गुन्हेगारांवर योग्य कारवाई झाली म्हणून पोलिस कर्मचारी किशोर पाटील, तसेच क्राईम दप्तर अद्ययावत ठेवल्यामुळे संदीप धनगर, राहुल चव्हाण यांचाही सन्मान केला.

विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यानंतर कोणतं पदक मिळणार? नेमकं काय होणार?
निरीक्षण व तपासणी दरम्यान उत्कृष्ट परेड केली तसेच इतर कामगिरी केली म्हणून पोलिस कर्मचारी हर्षल पाटील, चंद्रकांत पाटील, शेखर साळुंखे, अमोल पाटील, पोलिस कर्मचारी मोनिका पाटील, योगेश सोनवणे यांचाही रोख बक्षीस देऊन सन्मान केला. या वेळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक विकास देवरे, पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर उपस्थित होते.त्याचप्रमाणे पोलिस अधीक्षकांनी पोलिस कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गुन्ह्यांची निर्गती लवकर करा, सामान्य जनतेला न्याय द्या, खरे खोटे याची पडताळणी करा, अशा सूचना दिल्या. पोलिस पाटलांचीही स्वतंत्र बैठक घेऊन आगामी विधानसभा निवडणूका कायदा व सुव्यवस्था पारदर्शी व सुरळीत, शांततेत पार पाडा, असे आवाहन केले. पोलिस ठाणे व आवाराची पाहणी केली.

  • Related Posts

    पोलीसच निघाले भामटे, ग्रामसेवकाचे १६ लाख लुटले, बिंग फुटताच PSI सह ५ जण जेरबंद

    पोलीसच निघाले भामटे, ग्रामसेवकाचे १६ लाख लुटले, बिंग फुटताच PSI सह ५ जण जेरबंद जळगाव पोलीस दलाला हादरून सोडणारी एक बातमी समोर आली आहे. पैसे तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने एका…

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला जळगाव | भुसावळ येथील सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या अनिल हरी ब-हाटे यांच्या घरात लोखंडाची खिडकी तोडून 33 तोळ्याचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!

    पुण्याचाही झालाय बिहार; मनगट, कोपऱ्यापासून तोडला हात.

    पुण्याचाही झालाय बिहार; मनगट, कोपऱ्यापासून तोडला हात.

    त्र्यंबकमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; गोळ्या झाडून संपविलं, जमिनीच्या वादातून काढला काटा.

    त्र्यंबकमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; गोळ्या झाडून संपविलं, जमिनीच्या वादातून काढला काटा.