दुर्दैवी! परीक्षेपूर्वीच कापली गेली आयुष्याची दोरी, नाशिकमधील दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू.

इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुसाट दुचाकी चालविल्याने झालेल्या अपघातात करुण अंत झाला. ही घटना इंदिरानगर रस्त्यावर घडली.इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुसाट दुचाकी चालविल्याने झालेल्या अपघातात करुण अंत झाला. ही घटना इंदिरानगर रस्त्यावर घडली. वेदांत विशाल गुरसळकर (वय १६, रा. वज्रभूमी रो-हाऊस, वडाळा-पाथर्डी रस्ता) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. दुचाकी थेट रस्त्यालगत असलेल्या पाणीपुरीच्या गाडीवर आदळल्याने तेथील पत्रा गळ्यात शिरल्याने जखमी वेदांतचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.वेदांत हा शुक्रवारी (दि. २१) सायंकाळी साडेपाच वाजता पाथर्डी गावाकडून इंदिरानगरकडे त्याच्या दुचाकीवरून जात होता. त्यावेळी नियंत्रण सुटल्याने त्याची दुचाकी थेट शेजारी उभ्या असलेल्या पाणीपुरीच्या गाडीवर धडकली.

पाणीपुरीच्या गाडीचा पत्रा वेदांतच्या गळ्याला लागल्याने, तो रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. नागरिकांसह त्याची आजी ललिता यांनी त्याला जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. शनिवारी (दि. २३) उपचारादरम्यान मात्र वेदांतचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर इंदिरानगर पोलिसांनी रुग्णालयात जात अकस्मात मृत्यूची नोंद केली.दरम्यान, वेदांतचे वडील राज्य परिवहन महामंडळात वाहक पदावर कार्यरत असून, आई गृहिणी आहे. त्याला एक लहान भाऊ आहे. दरम्यान, वेदांत हा अल्पवयीन असून त्याच्याकडे वाहन चालविण्याचा पक्का परवाना नसताना सुसाट दुचाकी चालविल्याने त्याचा अपघात झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.

अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे हादेखील गुन्हा आहे. सध्या शालेय परीक्षा सुरू असल्याने अल्पवयील मुलांना वाहने देण्याकडे पालकांचा कल दिसून येत आहे. मात्र पालकांची ही बेपर्वाई जीवावर बेतत आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस पुढील तपास करीत असून, इतर पालकांनी या घटनेतून सजग होण्याची अपेक्षा सुज्ञ नाशिककरांनी व्यक्त केली आहे.शालिमार परिसरातून घराकडे जात असलेल्या तेरा वर्षीय मुलाची सायकल हिसकावून एका दुकानाच्या पार्किंगमध्ये त्याला नेत निर्दयीपणे अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सायंकाळी घडली. भयभीत मुलाने घरी जात कुटुंबीयांना हा प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांत धाव घेण्यात आली. या प्रकरणी भुश्या व लड्या या नावांच्या दोन संशयितांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्यासह इतर कलमानुसार भद्रकाली पोलिसांत गुन्हा नोंद आहे.

  • Related Posts

    जिल्हा रुग्णालयात नवजात बालक कक्षात अचानक शॉर्ट सर्किट, नाशिकमध्ये अनुचित प्रकार टळला.

    नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या कक्षात शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली. घटनेच्या वेळी कक्षात ६९ नवजात बालक होते. परंतु अनुचित घटना टळली आहे.नाशिकमधून मोठी बातमी…

    नाशकात थरार! अजित पवारांच्या नेत्याची हत्या, दोन सख्ख्या भावांना क्रूरपणे संपवलं.

    नाशकात अजित पवारांच्या नेत्याची हत्या करण्यात आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी धारदार सश्त्राने वार करत दोन सख्ख्या भावांना संपवलं आहे. या घटनेने नाशकात एकच खळबळ माजली आहे.नाशिक शहरामध्ये खुनाचे सत्र सुरूच…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सीमा हैदरला सुद्धा बोजा गुंडाळून अवघ्या 48 तासात पाकिस्तान वापसी करावीच लागणार? वकिलाने तातडीने दिली महत्वाची माहिती.

    सीमा हैदरला सुद्धा बोजा गुंडाळून अवघ्या 48 तासात पाकिस्तान वापसी करावीच लागणार? वकिलाने तातडीने दिली महत्वाची माहिती.

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया.

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया.

    हिनेच सुपारी देऊन…; पहलगाममध्ये पती गमावणाऱ्या महिलेबद्दल संतापजनक पोस्ट; ओसाफ नेमका कोण?

    हिनेच सुपारी देऊन…; पहलगाममध्ये पती गमावणाऱ्या महिलेबद्दल संतापजनक पोस्ट; ओसाफ नेमका कोण?

    मनिषा मानेंनी माफीनामा लिहून दिलेला, वकिलाचा दावा, डॉ. वळसंगकरांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट.

    मनिषा मानेंनी माफीनामा लिहून दिलेला, वकिलाचा दावा, डॉ. वळसंगकरांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट.