
नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या कक्षात शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली. घटनेच्या वेळी कक्षात ६९ नवजात बालक होते. परंतु अनुचित घटना टळली आहे.नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. येथील जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या कक्षात शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली. घटनेच्या वेळी कक्षात ६९ नवजात बालक होते.
परंतु सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. शॉर्ट सर्किट झाल्यानंतर त्वरित सर्व बालकांना दुसऱ्या कक्षात हलवण्यात आले. शॉर्ट सर्किट झाल्याचे लक्षात येताच परिचरिकांनी परिचारिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुपारी दोन वाजता वॉर्डमधील कॉरिडॉरमध्ये इलेक्ट्रिक स्पार्किंग झालं. ते त्वरित नियंत्रणात आणलं गेलं आहे.
पीडब्ल्यूडीचे इलेक्ट्रिक इंजिनिअर बोलावून घटना नियंत्रणात आणली. तेथील बालकांना त्वरित आरक्षित वॉर्डमध्ये हलवण्यात आले. वॉर्डातील व्हेंटिलेटर आणि इतर उपकरणे व्यवस्थित सुरु होती आणि उपचार देखील व्यवस्थित सुरु होते. थोड्याच वीजपुरवठा देखील सुरळीत करण्यात आला.
Video Player
00:00
00:00