
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी रायगडावर महाराजांना अभिवादन केले. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, खासदार उदयनराजे भोसले, खासदार मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आदिती तटकरे, मंत्री आशिष शेलार, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यादरम्यान आपल्या भाषणामध्ये उदयनराजेंनी पाच मागण्या केल्या. नेमक्या कोणत्या जाणून घ्या.छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात समतेचा आणि सर्वधर्मसमभावाचा विचार दिला होता. एकमेव असा राजा, युगपुरूष होऊन गेला. ज्याने नेहमी लोकांसाठी आयुष्य वेचलं. हा संपूर्ण विचार घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि आज आपण लोकशाही पाहतोय त्या काळात जो विचार दिला होता की लोकांचा सहभाग राज्यकारभारात असला पाहिजे याचा मूळ पाया शिवाजी महाराजांनी रचला आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील प्रत्येक क्षण लोकांसाठी वेचला त्यांचा अवमान केला जातो.
या घटना वाढताना दित आहेत. त्यामुळे या ठिकाणी मी गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांना मी चार ते पाच मागण्या करणार आहे. तो कायदा ज्यामध्ये बेल नसणार आणि दहा वर्षे कारागृहाची शिक्षा असणार आहे. संपूर्ण शासनमान्य असा इतिहास शासनाने प्रकाशित करावा जेणेकरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव आणि तेढ निर्माण होऊ नये, असं उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी म्हटलं आहे.सिनेमॅटिक लिबर्टीच्याबाबतीत सेन्सॉर बोर्डची स्थापना करण्यात यावी. जेणेकरून एखादा स्वत:च्या कल्पनेतून एखादी कांदबरी लिहितो आणि त्याला ऐतिहासिक पुरावे नसतात. त्यामुळे अलिकडच्या काळात छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गैरसमज निर्माण होतो. त्यामुळे सेन्सर बोर्डची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी उदयनराजे भोसलेंनी केली.
Video Player
00:00
00:00