सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ( Solapur Agricultural Produce Market Committee) निवडणुकीवरुन चांगलच वातावरण गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.निवडणुकीवरुन चांगलच वातावरण गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kallyanshety) यांनी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केल्यानंतर भाजप आमदार सुभाष देशमुखांकडूनही (Subhash Deshmukh) राजकीय फिल्डिंग लावायला सुरुवात झाली आहे. पारंपारीक विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे (Baliram Sathe) यांची सुभाष देशमुखांनी भेट घेतली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.










