भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि दुचाकी थेट झाडाला आदळली. या घटनेत दोन सख्ख्या भावांसह तिघांनी आपला जीव गमावला आहे.भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडाला आदळून दोन सख्ख्या भावंडांसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना १७ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील घोट रस्त्यावरील ठाकूरनगर पहाडीजवळ घडल्याची माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी झाडाला आदळताच पेटली आणि जळून खाक झाली.सौरभ सुभाषित चक्रवर्ती (वय २०), साहेब सुभाषित चक्रवर्ती (वय १६, दोघेही राहणार वसंतपूर ता. चामोर्शी) आणि विशाल भूपाल बाछाड (वय १९, रा. सिरपूर, जिल्हा कोमरमभीम, तेलंगाणा) असे दुचाकी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नाव आहेत.










