पाठवा ना ज्योतीला घरी, नवऱ्याची सासुरवाडीत विनवणी; विरहात वाद झाला अन् पतीचा जीव गेला.

दहा वर्षांपूर्वी ताराचंद याचे ज्योती यांच्यासोबत लग्न झाले. त्यांच्यात खटके उडायला लागले. दीड महिन्यापूर्वी ज्योती या माहेरी गेल्या.पत्नीच्या विहरामुळे तो तणावात राहायला लागला. पत्नीला परत पाठवा अशी विनवणी तो सासरच्यांना करायला लागला. विनवणी करतानाचा युवकाचा मेहुण्यासोबत वाद झाला. वाद विकोपाला गेला अन् मेहुण्याने जावायला संपविले. ही थरारक घटना नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कळमना गावात घडली.
ताराचंद शिवचरण प्रजापती (वय 35, रा. गोकुलनगर, कळमना) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी मेहुण्याला अटक केली. राहुल दिलीप इंगळे (वय 24) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
दहा वर्षांपूर्वी ताराचंद याचे ज्योती यांच्यासोबत लग्न झाले. त्यांच्यात खटके उडायला लागले. दीड महिन्यापूर्वी ज्योती या माहेरी गेल्या. पत्नीच्या विरहात ताराचंद तणावात राहायला लागले.

परत आणण्यासाठी ताराचंद हो नेहमी सासरी जायचा. ज्योती या परत येण्यास नकार द्यायच्या.बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ताराचंद हा सासरी गेला. त्याने ज्योती यांना परत चालण्यास म्हटले. यावेळी राहुल तेथे आला. माझ्या पत्नीला परत का पाठवत नाही, असे ताराचंद राहुल याला म्हणाले. दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला जाताच राहुलने विटेने डोके ठेचून ताराचंदची हत्या केली.घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी राहुल याला अटक केली. त्याची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.दुसरीकडे, ‘उसने दिलेले दहा हजार रुपये चारचौघांसमोर का मागतो’ म्हणत चुलतभावाची लाकडी दांड्याने डोक्यावर प्रहार करून हत्या करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथे गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. अमोल दिगंबर मगर (३३) असे मृत युवकाचे नाव आहे.या प्रकरणी चुलतभाऊ पंकज राजेंद्र मगर (३५) याला अमडापूर पोलिसांनी अटक केली आहे. अमोल हा बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घरातील पलंगावर आराम करीत होता. त्याचवेळी पंकज आला आणि उसने दिलेले दहा हजार रुपये का मागतो म्हणत अमोलला मारहाण करून ठार केले. घटनेचा तपास ठाणेदार निखिल निर्मळ करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.