ऑनलाइन डेटसाठी आठ मुलींचे फोटो, एक ठरली, पैसे भरले तो शिवाजीनगरलाही गेला पण… पुण्यातील धक्कादायक घटना.

 पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन डेटसाठी तरूणाने नोंदणी केली, त्याला मुलींचे फोटोही पाठवण्यात आले पण त्यानंतर तो ठरलेल्या हॉटेल शिवाजीनगर गेला त्यानंतर काय घडलं जाणून घ्या.डेटिंग वेबसाइट’ च्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी खडकमाळ आळीतील तरुणाला एक लाख ३५ हजार रुपयांना ऑनलाइन गंडा घातला. आलिशान हॉटेलमध्ये मुलींना ‘डेट’ वर भेटायचे असेल, तर अकाउंट लॉग-इन, बुकिंग, नोंदणी अशा बहाण्यांनी सायबर चोरट्यांनी या तरुणाकडून वेळोवेळी पैसे उकळले. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर हवालदिल झालेल्या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली.या प्रकरणी २९ वर्षीय तरुणाने खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, एका वेबसाइटसह मोबाइल क्रमांक व बँक खातेधारकांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) (फसवणूक), ), ३१९ (२) (तोतयेगिरी करून फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नऊ ते १७ नोव्हेंबरच्या कालावधीत ऑनलाइन घडली.

तक्रारदार तरुणाने एमबीए केले असून, सध्या तो बेरोजगार आहे. त्याला मोबाइलवर एका डेटिंग वेबसाइटवरून मोवाइल क्रमांक मिळाला. त्यावर त्याने व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क केला असता, सायवर चोरट्यांनी बुकिंग, अकाउंट लॉग-इन, रजिस्ट्रेशन अशा विविध बहाण्यांनी त्याच्याकडे पैसे मागितले.तक्रारदार तरुणाने ऑनलाइन पैसे पाठविल्यावर त्याला सात ते आठ मुलींची छायाचित्रे पाठवून शिवाजीनगर येथील एका आलिशान हॉटेलमध्ये डेटिंगसाठी बोलावले. मात्र, तिथे त्याला कोणीही भेटले नाही. त्यानंतर तक्रारदार तरुणाने पुन्हा त्याच वेबसाइटवरच्या आणखी एका मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून डेटिंगबाबत विचारणा केली.

त्यावर सायबर चोरट्यांनी पुन्हा नोंदणीसह विविध कारणे सांगून तरुणाकडून पैसे उकळले. अखेर ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदार तरुणाने सायबर पोर्टलवर दोन तक्रारी देत खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक मनोजकुमार लोढे तपास करीत आहेत.दरम्यान, ऑनलाइन सर्व काही उपलब्ध होत असल्याने अनेकजण अशा वाईट गोष्टींसाठी स्वत:ची फसवणूक करून घेतात. अशा अनेक घटना आता समोर येऊ लागल्या आहेत. यातील प्रमुख गोष्ट म्हणजे फसवणूक झाल्यावर प्रतिष्ठेपाई पोलिसांकडे जात नाहीत. त्यामुळे अनेकजणांना असा आर्थिक भूर्दंड बसल्यावर ते नुकसान सहन करतात आणि कोणाला काही बोलत नाहीत. त्यामुळे अशा गोष्टींपासून सावध रहा.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.