अकोल्यात ट्रक आणि दुचाकीचा विचित्र अपघात, एकजण ठार सात जखमी.

 अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी-महान रोडवर भीषण अपघात झाला. विटा घेऊन जाणाऱ्या ट्रकने दोन दुचाकींना धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून, वाहतूक सुरळीत केली आहे. भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनांमुळे हा अपघात झाल्याचा अंदाज आहे.कोला जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणत वाढ होताना दिसत आहे. अपघातामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. 12 एप्रिलला सकाळी साडेदहाच्या सुमार बार्शीटाकळी महान रोडवरील रेडवा टी पॉईंटवर विचित्र अपघात घडला. यात एकाच मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत.अकोल्याकडून महानकडे विटा घेऊन जाणाऱ्या एम. एच. 28 एच 9646 क्रमांकाचा ट्रक आणि महानकडून बार्शीटाकळीकडे जाणाऱ्या दोन मोटर सायकलच्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

तर सात जण जखमी झाले आहेत. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी – महान रोडवर ही घटना घडली आहे. अपघातात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि ट्रक झाडावर आदळून पलटी झाला.जखमींवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. संबंधित अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरणाचा तपास करत आहे. विटा घेऊन जाणाऱ्या या ट्रकच्याखाली आणखी काही लोक दबले होते. तर गावकऱ्यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करून जखमींना बाहेर काढण्यात आले. अपघातात जखमी आलेल्या रुग्णांना तातडीने जखमींना अकोल्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वोपचार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. घटनास्थळावर पाहणी करून पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना व मृत्यांना बाहेर काढले. अपघात झाल्यानंतर ह्या मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. बार्शीटाकळी पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली. हा विचित्र अपघात कसा घडला याचा तपास आता बार्शीटाकळी पोलीस करत आहेत.विटा आणि रेती वाहतूक करणारे अनेक वाहन रस्त्यावर भरधाव चालतात. यांच्यावर नियंत्रण घालने आवश्यक आहे. अश्याच भरधाव वाहनाच्या धडकेत हा अपघात घडलाय. त्यामुळे पोलिसांनी अश्या भरधाव वाहनावर लगाम लावण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांनी वेळीच अश्या भरधाव वाहनाच्या वेगमर्यादेवर आळा घातला तर अश्या प्रकारच्या अपघातांवर आळा बसेल आणि नागरिकांचे प्राणही वाचू शकतील.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.