
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव 2025 तर्फे घेण्यात आलेल्या प्रबोधन सप्ताह चा आजचा सातव्या दिवशी समितीतर्फे दोन कार्यक्रम घेण्यात आले भव्य विनामूल्य कॅन्सर तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर तसेच पोलीस भरती पूर्व परीक्षा राबविण्यात आले.सकाळी दहा वाजता महाआरोग्य शिबिर व कॅन्सर निदान शिबिर तसेच रक्तदान शिबिर हा कार्यक्रम पिंपराळा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घेण्यात आला त्यानिमित्त तज्ञ डॉक्टरांची टीम चे सहकार्य लाभले एच सी जी मानवता कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे आरोग्य शिबिर विनामूल्य कॅन्सर तपासणी शिबिर राबविण्यात आले .या अंतर्गत तोंडाच्या कर्करोगाची तपासणी, स्थनाचा कर्करोगाची तपासणी, महिलांच्या आजारांवर सल्ला व मार्गदर्शन .पुरुषांसाठी फ्री चेकअप, तोंडाच्या कर्करोगाची तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला ,यानिमित्त देण्यात आला .
बीपी, शुगर ,इसीजी यासारख्या जनरल तपासण्या मोफत करण्यात आल्या. एच सी जी चे राहुल सूर्यवंशी सर यांनी ह्या शिबिराला सहकार्य केले. तसेच नाशिकचे डॉ.कौस्तुभ कुमार यांनी कॅन्सर साठीची तपासणी घेतली .आरोग्य शिबिराचे उद्घाटन जळगावचे आमदार राजीनामा भोळे यांनी केले सोबत डॉक्टर क्षितिज भालेराव तसेच आर एल हॉस्पिटलचे डॉ प्रियंका, डॉ स्वप्निल सर, यांच्यासोबत त्यांचा नर्स स्टाफ सुद्धा सोबत होता. विनामूल्य कॅन्सर तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर सकाळी 10 ते संध्याकाळी पाच पर्यंत चालला सोबत रक्तदान शिबिर सुद्धा घेण्यात आले.तसेच 12 एप्रिल रोजी सकाळी बारा वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती व दर्जी फाउंडेशन जळगाव यांच्यातर्फे पोलीस भरती पूर्व परीक्षा विनामूल्य घेण्यात आले.
त्यासोबत विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी लागणारे साहित्य मोफत देण्यात आले अशा या पोलीस भरती पूर्व परीक्षा मध्ये जवळपास 280 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. ह्या पोलीस भरती पूर्व परीक्षा साठी गोपाल दर्जी सरांनी यासाठी अमूल्य सहकार्य केलं .या कार्यक्रमाचे आयोजक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे यांनी केले. सोबत माजी अध्यक्ष सतीश गायकवाड उपाध्यक्ष भारती रंधे मोनू अडकमोल सचिव नीलू ताई इंगळे सहसचिव तुषार सोनवणे खजिनदार सचिन सरकटे सर सल्लागार हरिश्चंद्र सोनवणे सर सदस्य ध्रु बागुल राजू डोंगरे संगीता मोरे कार्याध्यक्ष चंद्रमणी मोरे .चंदा इंगळे, संगीता पगारे, संध्या तायडे, छाया पाटील, निर्मला साळुंखे, आशा खैरनार ,पूजा इंगळे, शारदा इंगळे, शारदा तायडे. आदींनी या कार्यक्रमांमध्ये श्रमदान केले.