
फेब्रुवारी – मार्च २०२५ च्या १० वी व १ २वी परीक्षेतील खेळाडू विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव पाठविण्याकरिता मुदतवाढ.जळगाव, फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (.१२वी) परीक्षेसाठी कीडा गुण सवलतीचे प्रस्ताव जिल्हा कीडा अधिकारी यांचेकडून आपले सरकार प्रणालीव्दारे
ऑनलाईन पध्दतीने दि.१५ एप्रिल २०२५ पर्यंत स्विकारण्याबाबत सर्व विभागीय मंडळांना कळविण्यात आलेले होते.तथापि दि.१० एप्रिल ते दि.१४ एप्रिल २०२५ या कालावधीत ‘आपले सरकार’ सेवा पोर्टल नियमित देखभालीसाठी बंद राहणार असल्याने
सर्व जिल्हा कीडा अधिकारी कार्यालयाकडून खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने संबंधित विभागीय मंडळाकडे सादर करण्यासाठी दि.२१ एप्रिल २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती देविदास कुलाळ यांनी दिली आहे.