जळगावात एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. हर्षल थाडे या मुलाला चालता येत नसल्याने रुग्णालयात दाखल केले होते, जिथे डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. उपचारासाठी कुटुंबियांनी व्याजाने पैसे जमा केले,गेल्या काही दिवसांपासून रूग्णालयाच्या मुजोरीचे प्रकार पुढे येत आहेत. १० लाख रूपये भरले नसल्याने पुण्यात तनिषा भिसे यांच्यावर उपचार करण्यात नाही आलेत. आता जळगावातील एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे येताना दिसतंय. रूग्णाच्या कुटुंबियांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप केलाय. मुलाच्या उपचारासाठी वडिलांनी व्याजाने पैशांची जुळवाजुळव केली. मात्र, डॉक्टरांनी थेट मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. संबंधित डॉक्टरावर कारवाई करण्याची मागणी केली जातंय.










