
भोपाळच्या शाहजहानबाद पोलीस स्टेशन परिसरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणावरून दोन मुलींमध्ये पोलिस ठाण्यात जबरी भांडण झाले. हळूहळू वाद इतका वाढला की दोघीही एकमेकांशी जोरजोरात भांडू लागल्या. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही मुलींना पोलिस ठाण्यात बोलावले होते. एक तरुणी तिच्या कुटुंबासह पोलिस स्टेशनमध्ये आली होती. बघता बघता दोघींमध्ये तुंबळ हाणामारी झाली.भोपाळमधील शाहजहानबाद पोलीस ठाण्यात एकाच तरुणासाठी दोन मुलींमध्ये तुफान हाणामारी झाली. पोलिसांनी दोन्ही मुलींना पोलिस ठाण्यात बोलावले होते. संभाषणादरम्यान दोघीही एकमेकांवर आरोप करत भांडू लागल्या. यावेळी पोलिसांनी दोघींनाही समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्या दोघीही पोलिसांचं ऐकत नव्हत्या. अखेर पोलिसांनी दोघींविरुद्ध क्रॉस एफआयआर दाखल केली आहे.
भोपाळच्या शाहजहानबाद पोलीस स्टेशन परिसरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणावरून दोन मुलींमध्ये पोलिस ठाण्यात जबरी भांडण झाले. हळूहळू वाद इतका वाढला की दोघीही एकमेकांशी जोरजोरात भांडू लागल्या. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही मुलींना पोलिस ठाण्यात बोलावले होते. एक तरुणी तिच्या कुटुंबासह पोलिस स्टेशनमध्ये आली होती. बघता बघता दोघींमध्ये तुंबळ हाणामारी झाली.पोलिसांनी दोघींविरुद्ध क्रॉस एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे. शाहजहानाबाद पोलिस स्टेशनचे प्रभारी उमेश चौहान यांनी सांगितले की, दुपारी एक मुलगी पोलिस स्टेशनमध्ये आली होती. तिने तिच्या तक्रारीत सांगितले की, तिचे लग्न एका तरुणासोबत निश्चित झाले आहे. आणि साखरपुडाही झाला आहे. पण त्या तरुणाच्या घराजवळ राहणारी एक मुलगी त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. समजावून सांगूनही तिला समजत नाहीये.तर दुसरी मुलगी म्हणते की ती त्या मुलाला त्रास देत नाहीये, तर तो मुलगा तिच्या मागे लागला आहे. दोघींनाही पोलिसांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला तरीही दोघी वाद घालत होत्या. अखेर पोलिसांना नाईलाजाने दोघींविरुद्ध एफआयआर दाखल करावी लागली.शाहजहानाबाद पोलिस स्टेशनचे प्रभारी उमेश चौहान यांनी सांगितले की, दोन्ही मुली आपापसात प्रचंड भांडत होत्या. दोघींनाही पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या एकमेकींवर दोषारोप करत होत्या. शेवटी दोघींवरही क्रॉस एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रकरणाची संपूर्ण शहानिशा करण्यात येईल. त्यानंतर कारवाई केली जाईल.