उपराजधानीत कॅफे मालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा २८ वर्षीय अविनाश भुसारी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. टोळीयुद्धातून भुसारी यांना संपवण्यात आलं.नागपूर: उपराजधानीत कॅफे मालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा २८ वर्षीय अविनाश भुसारी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. टोळीयुद्धातून भुसारी यांना संपवण्यात आलं. गेल्या ३ महिन्यात टोळीयुद्धातून नागपुरात २ हत्या झाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यातच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.अविनाश भुसारी यांच्यावर पॉईंट ब्लँकवरुन गोळ्या झाडण्यात आल्या. राम नगर आणि लक्ष्मी भुवनला जोडणाऱ्या रस्त्यावर भुसारींना संपवण्यात आलं.










