रविना एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. ती सोशल मीडियावर Reels आणि व्हिडिओ बनवते. तिच्या व्हिडिओमुळे तिची लोकप्रियता वाढली होती. याच दरम्यान तिची ओळख सुरेशसोबत झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.हरियाणातील भिवानीमध्ये एका महिलेने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून केला. त्यानंतर दोघांनी मिळून नवऱ्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला. संबंधित महिलेला तिच्या पतीने प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर हे हत्याकांड घडले. आरोपी महिलेचे नाव रविना असून ती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. या प्रकरणी पोलिसांनी रविनाला अटक केली आहे, तर तिचा प्रियकर सुरेश पसार आहे.रविना आणि प्रवीण यांचे लग्न 2017 मध्ये झाले होते. त्यांना सहा वर्षांचा मुलगा आहे. रविनाची ओळख दोन वर्षांपूर्वी सुरेशसोबत झाली. सुरेश त्याच्या YouTube अकाउंटसाठी व्हिडिओ बनवत असे. रिपोर्टनुसार, रविनाचा नवरा प्रवीण या गोष्टीला विरोध करत होता. तरीही रविना आणि सुरेश एकत्र व्हिडिओ बनवत होते.










