शेतकऱ्याला मारहाण करत संपवण्याची धमकी, भररस्त्यात हवेत गोळीबार; डोंबिवलीत धक्कादायक घटना.

शेतकऱ्याला मारहाण करत त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मुजोर ग्रामस्थ यावरच थांबला नाही, तर त्याने शेतकऱ्याला मारण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबारही केला. या प्रकरणाने डोंबिवलीमध्ये खळबळ माजली आहे.डोंबिवली जवळील भोपर गावातील एका ४३ वर्षाच्या शेतकऱ्याला किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली. गावातील हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत गावातील एका ग्रामस्थाने शेतकऱ्याला मारहाण केली. त्यानंतर पुन्हा त्या शेतकऱ्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने ग्रामस्थाने घरातून वडिलांची बंदूक आणून त्याला मारून टाकण्याची धमकी देत बंदुकीतून हवेत गोळीबार केला. या गोळीबार प्रकरणी भोपर गावातील शेतकरी महेंद्र पाटील (४३) यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात भोपर गावातील रहिवासी योगेश मढवी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार महेंद्र पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या प्राथमिक तपासणी अहवालात म्हटलं आहे, की शनिवारी हुनमान जयंती होती. भोपर गावातील हनुमान मंदिरात जयंतीनिमित्त पालखी सोहळा आयोजित केला होता. या पालखी सोहळ्यात ग्रामस्थ उत्साहाने सहभागी झाले होते. या मिरवणुकीत शेतकरीही इतरांप्रमाणे नाचत होतो. यावेळी योगेश मढवी यांनी आपल्याला पाठीमागून जोराचा धक्का दिला आणि त्याने त्याच्या कडील गळ्यातील साखळी काढून जोरात शेतकऱ्याच्या पाठीत मारली. त्यावेळी गावात देवाचा उत्सव असल्याने शेतकऱ्याने या प्रकरणाबाबत कोणाला काहीही सांगितलं नाही.या घटनेनंतर शेतकरी महेंद्र पाटील हनुमान मंदिरात दुसऱ्या दिवशी सकाळी देवदर्शनासाठी जात होते. त्यावेळी योगेश मढवी यांनी शेतकरी महेंद्र यांना पुन्हा आवाज देऊन थांबवले आणि ‘काय रे तुला रात्रीचा मार कमी पडला आहे का,’ असा प्रश्न केला. यावेळी या मारहाण प्रकरणामुळे त्रस्त महेंद्र पाटील यांनी योगेश यांना ‘दादा तुम्ही मला निष्कारण का त्रास देत आहात.

मी तुम्हाला काही केले नसताना तुम्ही मला असेच त्रास देत असाल तर मी आत्महत्या करतो,’ असे उद्विग्न अवस्थेत बोलले.यावेळी योगेश मढवी यांनी महेंद्र पाटील यांना उद्देशून ‘अरे तु कशाला आत्महत्या करतोस. मीच तुला ठार मारतो थांब.’ असे बोलून योगेश मढवी आपल्या घरी गेला. त्यांनी वडिलांची बंदूक सार्वजनिक ठिकाणी आपण उभा होतो त्या ठिकाणी आणली. आपल्याला पाहून योगेश यांनी बंदुकीतून हवेत गोळीबार केला. महेंद्र पाटील यांना उद्देशून ‘आता तुम्हाला मारूनच टाकतो,’ अशी धमकी दिली. महेंद्र पाटील यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत हा सर्व तपशील दिला आहे.यावेळी योगेश मढवी यांनी महेंद्र पाटील यांना उद्देशून ‘अरे तु कशाला आत्महत्या करतोस. मीच तुला ठार मारतो थांब.’ असे बोलून योगेश मढवी आपल्या घरी गेला. त्यांनी वडिलांची बंदूक सार्वजनिक ठिकाणी आपण उभा होतो त्या ठिकाणी आणली. आपल्याला पाहून योगेश यांनी बंदुकीतून हवेत गोळीबार केला. महेंद्र पाटील यांना उद्देशून ‘आता तुम्हाला मारूनच टाकतो,’ अशी धमकी दिली. महेंद्र पाटील यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत हा सर्व तपशील दिला आहे.दरम्यान या गोळीबार घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि या प्रकरणाचा तपास करून तर भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ कलम ११८ (१), ३५२, ३५१ (२) आणि शस्त्र अधिनियम, १९५९ कलम ३, २५, २७ प्रमाणे योगेश मढवीविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणात योगेश मढवी याची चौकशी सुरू असून अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.