हायकोर्टाच्या वकिलाची लेकींसह नदीत उडी; मनगटावर जखम, कमरेवर भाजल्याची खूण; संशय वाढला.

 उच्च न्यायालयात वकील असलेल्या महिलेनं तिच्या दोन मुलांसह आयुष्य संपवलं. जिस्मोल थॉमस (वय ३४ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या वकिलाचं नाव आहे. मुलगी नेहा (वय ५ वर्षे) आणि नोरा (वय २ वर्षे) यांच्यासह जिस्मोननं जीवनयात्रा संपवली.तिरुअनंतपुरम: उच्च न्यायालयात वकील असलेल्या महिलेनं तिच्या दोन मुलांसह आयुष्य संपवलं. जिस्मोल थॉमस (वय ३४ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या वकिलाचं नाव आहे. मुलगी नेहा (वय ५ वर्षे) आणि नोरा (वय २ वर्षे) यांच्यासह जिस्मोननं जीवनयात्रा संपवली. जिस्मोल थॉमस मुथोली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच होत्या. नदीत उडी घेत त्यांनी दोन लेकींसह जीव दिला. या घटनेनं परिसरावर शोककळा पसरली आहे.केरळच्या इत्तूमन्नूरमधील मुथोली गावच्या माजी सरपंच जिस्मोल थॉमस यांनी त्यांच्या दोन मुलींसह आत्महत्या केली. मिनाचील नदीत उडी टाकून त्यांनी आयुष्याची अखेर केली. इत्तूमन्नूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अनैसर्गिक मृत्यूची नोंद पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. थॉमस यांनी लेकींसोबत टोकाचं पाऊल का उचललं, ते अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.आत्महत्येची घटना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. जिस्मोल त्यांच्या दोन मुलांसह स्कूटरनं नदीजवळ आल्या. या भागात नदीचं पात्र जास्त खोल आहे. त्यामुळे नदीचा हा भाग अधिक धोकादायक आहे. जिस्मोल त्यांच्या दोन मुलींना घेऊन नदीच्या तिरावर आल्या. यानंतर त्यांनी लेकींसह नदीत उडी घेतली. काही वेळानं त्यांचे मृतदेह ग्रामस्थांना दिसले. त्यांनी तिघांना रुग्णालयात नेलं. पण त्यांचा जीव वाचू शकला नाही.मंगळवारी सकाळच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं पोलिसांनी सांगितलं. ‘जिस्मोल यांच्या मनगटाची नस कापलेली होती. स्थानिकांच्या माहितीनुसार, त्यांच्या कमरेवर भाजल्याच्या खुणा होत्या. जिस्मोल यांनी विषप्राशन केल्याचा संशय आहे. त्यांच्या घरात असलेल्या पंख्याचं पातंही वाकलेलं आढळून आलं. त्यामुळे त्यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला असावा,’ असा पोलिसांचा कयास आहे.जिस्मोल यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलींचे मृतदेह कोट्टायम वैद्यकीय महाविद्यालयातील शवागारात ठेवण्यात आले. तिघांच्या मृतदेहांवर अद्याप अंत्यसंस्कार झालेले नाहीत. जिस्मोल या मुथोली गावच्या माजी सरपंच लिसी थॉमस यांच्या कन्या होत्या. लिसी थॉमस यांच्या अपघाती निधनानंतर जिस्मोल यांनी राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवत त्यांनी विजय मिळवला आणि सरपंच झाल्या. जिस्मोल यांचे पती जिम्मी जोसेफ तेल्लाकम कार्टिस रुग्णालयात इलेक्ट्रिक इंजिनीअर आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.