नाशिकमध्ये वादग्रस्त धार्मिक स्थळावरील कारवाईवरून तणावपूर्ण शांतता; पोलिसांचा रात्रभर खडा पहारा.

शहरातील काठे गल्ली परिसरातील वादग्रस्त धार्मिक स्थळाचे अतिक्रमण शनिवारी नाशिक महानगरपालिकेने हटवले. यानंतर काठे गल्लीसह द्वारका परिसरात तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे. शहरातील काठे गल्ली परिसरातील वादग्रस्त धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काल नाशिक महानगरपालिकेने हटवले. हिंदू संघटनांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. यावेळी दोन गट आमने-सामने आल्याने नाशिक शहरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत होते.

वादग्रस्त धार्मिक स्थळाच्या परिसरातील अतिक्रमण हटवल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेने दिली आणि प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर हिंदू संघटनांनी सात दिवस आंदोलन स्थगित केल्याचा निर्णय घेतला. मात्र रात्रभरापासून नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात पोलिसांचा खडा पहारा पाहायला मिळत आहे. सध्याचे वातावरण नियंत्रणात असले तरी देखील काहीसे तणावाचे वातावरण दिसून येत आहे. नाशिक शहरात जमावबंदीचे आदेश आहे तर काठे गल्ली परिसरातील रस्ते अद्यापही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेले द्वारका भागातील काठेगल्ली सिग्नलजवळीत एका धार्मिक स्थळाभोवती असलेले अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने काल जमीनदोस्त केले. पोलिसांचे काटेकोर नियोजन आणि दोन्ही समाजांकडून दाखविण्यात आलेल्या सामंजस्यामुळे अतिक्रमण निर्मूलन मोहीम शांततेत पार पडली. सकाळी अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू झाल्यानंतर काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी आंदोलन करण्यापूर्वीच महंत सुधीरदास पुजारी यांच्यासह काही समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

तर महंत अनिकेत शास्त्री यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. यावेळी आ. देवयानी फरांदे यांनीही या ठिकाणी येत संपूर्ण अतिक्रमण काढले नाही तर आंदोलन करणार, अशी भूमिका घेतली होती.अतिक्रमण काढण्यासाठी काही संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून या संपूर्ण भागात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येऊन कलम 144 लागू करण्यात आले होते. मात्र, मनपाने सकाळपासून कारवाईला सुरुवात केल्याने व पोलिसांनी केलेल्या चोख नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सकाळीच काठे गल्ली येथील सिडनी टॉवर शेजारील ओपन स्पेसमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.धार्मिक स्थळाला धक्का न लावता इतर बाजूचे अतिक्रमण काढण्यात आले असल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र रात्रभरापासून नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात पोलिसांचा खडा पहारा पाहायला मिळत आहे. सध्याचे वातावरण नियंत्रणात असले तरी देखील काहीसे तणावाचे वातावरण दिसून येत आहे. शहरात जमावबंदीचे आदेश आहे तर काठे गल्ली परिसरातील रस्ते अद्यापही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. 

  • Related Posts

    भारतीय वृत्तवाहिन्यांवर पाकिस्तानातील पत्रकार व विश्लेषकांना आमंत्रित करण्यावर तात्काळ बंदी आणावे : ॲड. जमील देशपांडे

    अलीकडेच पहेलगाम (जम्मू-काश्मीर) येथे भारतीय नागरिकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप भारतीयांचे बळी गेले. या प्रकारामुळे संपूर्ण देशामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. भारताच्या सार्वभौमत्वावर, अखंडतेवर वार करणाऱ्या अशा घटनेनंतरही,…

    चांगले गुण देण्याचे आमिष देवून दोन शिक्षकांनी केला विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार !

    राज्यातील अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच बुलढाण्यातील‎ मलकापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याच्या आईवर दोन शिक्षकांनी वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मुलाला चांगले गुण देण्याचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भारतीय वृत्तवाहिन्यांवर पाकिस्तानातील पत्रकार व विश्लेषकांना आमंत्रित करण्यावर तात्काळ बंदी आणावे : ॲड. जमील देशपांडे

    भारतीय वृत्तवाहिन्यांवर पाकिस्तानातील पत्रकार व विश्लेषकांना आमंत्रित करण्यावर तात्काळ बंदी आणावे : ॲड. जमील देशपांडे

    अजित पवार गटाला ‘दे धक्का’, आबांकडून मामांचा पराभव; आदिनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी नारायण पाटील

    अजित पवार गटाला ‘दे धक्का’, आबांकडून मामांचा पराभव; आदिनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी नारायण पाटील

    गायक नेहा सिंह राठोडवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

    गायक नेहा सिंह राठोडवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

    पाकिस्तानला दणका, चीनची वाढली चिंता; भारताच्या पॉवरफुल निर्णयानं सागरी समीकरणं बदलली.

    पाकिस्तानला दणका, चीनची वाढली चिंता; भारताच्या पॉवरफुल निर्णयानं सागरी समीकरणं बदलली.